कापूस आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हं

Last Updated: Monday, November 21, 2011, 07:30

जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजनयांचं उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आमदार महाजन यांचं वजन अडीच किलोने घटलं आहे. त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दर्शवला आहे. सरकारला अजूनही या उपोषणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही.

कापूस आंदोलनाला हिंसक वळण

Last Updated: Saturday, November 19, 2011, 09:44

जळगाव जिल्ह्यात कापूस दरवाढीच्या आंदोलनाने चांगलाच वेग घेतला आहे. जळगाव औरंगाबाद महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केला. तर जामनेर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ४ बसेसची तोडपोड केली.

महापालिकेचेचं अतिक्रमण

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 14:42

नाशिक महापालिकेच्या इमारतीनंच पाटबंधारे विभागाची जागा बळकावली. माहितीच्या अधिकारात हे उघड होताच पाटबंधारे विभागानं महापालिकेला नोटीस बजावली. पण महिना उलटून गेला तरी महापालिकेनं काहीही कारवाई केलेली नाही.

वाल्याच्या झाला वाल्मिकी

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 06:26

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगलेल्या एका कैद्यानं आता न्यायालयात वकीली करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे खुनाच्या आरोपात शिक्षा भोगलेल्या हितेश शहा यानं आपली पदवी आणि वकिलीचं शिक्षण दोन्हीही कारागृहाच्या गजाआड राहून पूर्ण केलं.

बंटी, बबली चोरजोडी गजाआड

Last Updated: Sunday, November 13, 2011, 08:18

चोऱ्यांचं प्रमाण नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले असताना घरफोडी आणि चेन चोरणाऱ्या बंटी आणि बबलीला नाशिक पोलिसांनी जेरबंद केलं. त्यांच्याकडून चाळीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

गोदातीर उजळले लक्ष लक्ष दिव्यांनी

Last Updated: Friday, November 11, 2011, 17:07

त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री नाशिकचा गोदातीर लक्ष लक्ष दिव्यांनी प्रकाशमान झाला होता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं नाशिकमधल्या गोदाकाठावर महिलांनी दिवे सोडून गंगा आणि गोदावरीची पूजा केली.

पोलीस भरतीचे बळी....

Last Updated: Friday, November 11, 2011, 16:47

राज्यभरात सुरु असलेल्या पोलीस भरतीदरम्यान धावताना आणखी एका उमेदवार तरुणाचा मृत्यू झाला. याआधीच दोन दिवसांपूर्वी अमरावतीत एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. तर काल नाशिकमध्ये नांदेडहून भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

नाशिक भीषण अपघातात पाच जण ठार

Last Updated: Friday, November 11, 2011, 11:50

नाशिक जिल्ह्यात सटाण्याजवळ इंडिगो कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. कारमध्ये प्रवास करत असलेले सर्व जण ठार झाले आहेत. सर्व मृत अहमदनगरचे रहिवासी आहेत.

रूग्णाचा जीव गेल्याने हॉस्पिटलची तोडफोड

Last Updated: Friday, November 11, 2011, 15:13

जळगाव मध्ये एका रूग्णाला आपला जीव गमवावा लागल्यामुळे, रूग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.