लाखोंचा गंडा, फेसबुक चॅटींगचा नवा फंडा

Last Updated: Friday, November 4, 2011, 16:41

इंटरनेटवरील चॅटींग आजचा सगळ्यांची आवडीची गोष्ट. पण हेच चॅटींग किती महाग पडू शकतं. इंटरनेटवरची मैत्री कशी महागात पडते याचा अनुभव सध्या नाशिकमधले मनिष अग्रवाल घेत आहेच.

नाशिककरांनी अनुभवला 'एअर शो'चा थरार

Last Updated: Friday, November 4, 2011, 16:18

विमानांच्या चित्तथरारक कसरतीने नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. येणाऱ्या काळात शस्त्रास्त्रयुक्त हेलिकॉप्टर वायुसेनेत दाखल होणार असल्याने हवादलाची ताकद वाढणार असल्याचं ब्रिगेडिअर संजीव रैना सांगितलं आहे.

नद्या झाल्या वाळवंट, वाळू झाली सोनं

Last Updated: Friday, November 4, 2011, 08:24

जळगावात नद्या अक्षरश: वाळवंट बनल्या आहेत आणि वाळू म्हणजे सोनं झालं आहे. कारण वाळुचा अमर्याद उपसा केला जातो आणि प्रशासन असा वाळू उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यातुनही कमाई करते. त्यामुळे नद्यांचा मोठा प्रश्न पुढच्या काळात उभा राहू शकतो अशी भिती व्यक्त केली जाते.

धुळे सरकारी रुग्णालयाचा मुजोरीपणा

Last Updated: Thursday, November 3, 2011, 09:37

आदिवासी बालकांच्या कुपोषणाबाबत सरकारी यंत्रणेच्या असंवेदनशीलतेचा आणखी एक धक्कादायक प्रकार धुळे जिल्हा रुग्णालयात समोर आला आहे. एका कुपोषित बालकाच्या मृत्युनंतर त्याचं शव घरापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था रुग्णालयानं न केल्यामुळे मातेला मुलाचं शव पदरात घेऊन एस टी स्थानकावर रात्र काढावी लागली. मन हेलावून टाकणाऱ्या या प्रकारावर निर्ढावलेल्या सरकारी यंत्रणेचं उत्तरही संतापजनक आहे.

अण्णा उद्या दिल्लीत

Last Updated: Thursday, November 3, 2011, 05:59

अण्णा हजारें संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.

जळगाव पालिका मटक्याच्या जाळ्यात

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:23

जळगाव महापालिकेच्या इमारतीत मटक्याचा अड्डा असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वसुली विभागातच पालिकेच्या कर्मचा-यांचा मटक्याचा अड्डा सुरू होता. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं अड्डा उद्धवस्त केला.

गोदावरीकाठी संस्कृतींचा संगम

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 13:26

युवक बिरादरी आयोजित गोदावरी मिलन अभियानात हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीचा वेध घेत राम, कृष्णांचा कार्यकाल उलगडत, महावीर, बुद्धांच्या अहिंसेचा संदेश देऊन, भारतीय स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या पाच हजार वर्षांचा इतिहास "सदी की पुकार' या नृत्यनाटिकेद्वारे उलगडला.

सीसीटीव्हीवर भारी नाशिकचे चोर!

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 12:52

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लाऊनही नाशिकमधली गुन्हेगारी नियंत्रणात येत नाहीय. सीसीटीव्हीसह इतर तांत्रिक यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्याचं समोर आलं आहे. मग यंत्रणेवर एवढा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नाशिक महापालिकेत नोकरभर्तीचा वाद !

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 12:35

नाशिक महापालिकेनं नोकरभर्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र या भर्तीवरुन वाद सुरु झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप होतोय. या भरतीप्रक्रियेमुळे महापालिकेतही नाराजी आहे.