आता काय बोगस कार्डांचाच ‘आधार’ उरलाय?

Last Updated: Sunday, August 4, 2013, 13:37

आधारकार्ड काढण्यासाठी तलाठी आणि सरपंच यांची खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यात उघडकीस आलीय.

कोल्हापुरात चोरीचं सत्र सुरूच

Last Updated: Sunday, August 4, 2013, 07:19

कोल्हापूरात चोरीचं सत्र सुरूच आहे. काल मध्यरात्री शहराजवळील आऱ.के.नगर परीसरात असणा-या स्टेट बॅक ऑफ इंडीयाचं ए.टी.एम चोरट्यांनी फोडलं आहे.

बजाजमधील `बंद`वर तोडगा कधी निघणार?

Last Updated: Saturday, August 3, 2013, 18:19

पिंपरी चिंचवड जवळील चाकण इथल्या बजाज ऑटो प्लांट मधल्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदचा आज चाळीसावा दिवस आहे. कामगार आणि बजाज प्रशासन दोन्हीही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामूळं यातून अजूनही तोडगा निघालेला नाही.

बेकायदा बांधकामांना राष्ट्रवादीचा आशिर्वाद!

Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:10

पिंपरी-चिंचवडमध्ये सतत होणारा पाऊस पाहता, शहराला पुराचा धोका आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना नदीकाठी सर्रास बांधकामं सुरू आहेत आणि तीही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादानं. उत्तराखंडचं उदाहरण ताजं असताना सत्ताधा-यांनी कुठलाही धडा घेतलेला नाही.

पुणे, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी!

Last Updated: Thursday, August 1, 2013, 20:41

पुणे आणि नाशिकमध्ये उद्यापासून दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे. अजित पवार, पुणे महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत पुण्या्च्या पाणीपुरवठ्याबद्दल निर्णय घेण्यात आलाय.

राज्यातल्या तृतीयपंथींची लक्ष्मी आईची यात्रा

Last Updated: Thursday, August 1, 2013, 18:55

अहमदनगरच्या भिंगार इथे राज्यातले तृतीयपंथी लक्ष्मी आईची यात्रा करतात. रोगराईपासून संरक्षण तसंच सुखसमाधानासाठी ही यात्रा काढण्यात येते. चांदबिबीच्या काळापासून ही प्रथा आहे.

चुकीच्या पद्धतीनं सिझरीन; महिलेचा गेला जीव

Last Updated: Thursday, August 1, 2013, 17:19

डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला नाहक जीव गमवावा लागलाय. चुकीच्या पद्धतीनं सिझरिन केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. आणखी धक्कादायक बाब म्हणजे एक दिवसाच्या बाळाला तसंच सोडून डॉक्टर पसार झालाय.

बॉम्बस्फोटाला वर्ष उलटलं; बॉम्बसूट कधी मिळणार?

Last Updated: Thursday, August 1, 2013, 11:22

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण होतंय. स्फोटाच्या तपासाबाबत राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची पाटी कोरीच आहे

बिअर पार्टी उद्धवस्त, १२ मुली ताब्यात

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 21:34

लोणावळ्यातल्या एका बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. पवना डॅमच्या बॅक वॉटर परिसरात बंगल्यात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. छाप्यादरम्यान 12 मुलींसह 35 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

प्रमोशनसाठी सीईओ वडील मुलीला पाठवत बॉसकडे!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 21:30

वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात उघड झाली आहे. नोकरीमध्ये प्रमोशनसाठी स्वत:च्या मुलीला वरिष्ठासोबत शरीर संबंध ठेवण्याचा आग्रह मुलीच्या वडिलांनी केलाय.