कोयना, वारणा परिसरातील गावांना धोका

Last Updated: Friday, July 26, 2013, 09:05

राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि वारणा धऱणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३४ फुटांवर गेलीय.

इंजिनियर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

Last Updated: Friday, July 26, 2013, 20:18

पुणे ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद केली आहे. बँकांवर आणि त्यातही जिल्हा मध्यवर्ती बँकांवर ही टोळी दरोडे टाकायची. बॅंकेवरील एका दरोड्याच्या तयारीत असतानाच या टोळीला जेरबंद करण्यात आले.

कर्तव्यदक्ष अधिकारी, बदलीची तयारी!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 17:59

चांगले अधिकारी सध्याच्या काळात मिळणं तसं अवघडच... पण असा एखादा अधिकारी मिळाला तर त्याला सरकार कडून चांगली वागणूक मिळतेच असं नाही.. पिंपरी चिंचवडमध्येही असंच घडलंय.

सीसीटीव्हीत लाइव्ह मर्डर

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 21:04

धक्क्दायक बातमी पुण्याहून.... दारूच्या आहारी गेल्यानंतर काय होतं, याचं अतिशय धक्कादायक उदाहरण चाकणमध्ये समोर आलंय. दारूच्या नशेत अतिशय शांत डोक्यानं एका मित्रानंच मित्राचा खून केला. ही हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

नव दाम्पत्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Last Updated: Thursday, July 25, 2013, 07:28

पिंपरी-चिंचवडमध्ये हिंजवडी परिसरात एका नव विवाहित दाम्पत्याचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. मोहन चौधरी आणि त्यांची पत्नी नैनु चौधरी असं या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे.

सावधानः परिसरात झाले डास, तुमच्यावर खटल्याचा फार्स!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 19:36

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी.... तुमच्या घराच्या परिसरात जर डास असतील, तर थेट तुमच्यावर खटला दाखल होणार आहे. आणि आणि हा नुसताच इशारा नाही तर महापालिकेनं तशा प्रकारे दोन पुणेकरांवर कारवाईसुद्धा केली आहे.

कोकणात भरती... जळगावात पावसाचे आकडे वरती

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 18:44

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबागमधल्या माडबागायतीसह सुमारे १० घरांना आजच्या हायटाईडचा फटका बसलाय. समुद्राचं पाणी थेट घरांमध्ये घुसलंय.

मनसे नगरसेवकांकडून महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 20:07

मनसे नगरसेवकांनी महापौरांना बांगड्यांचा आहेर देऊन त्यांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. रेश्मा भोसले यांनी निवडणूक लढवताना मिळकत कर भरल्याचा दावा केला होता.

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:29

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...

काँग्रेसविरोधात मनसे हायकोर्टात!

Last Updated: Monday, July 22, 2013, 22:04

पुणे महापालिकेतल्या विरोधी पक्षनेतेपदाचा वाद आता हायकोर्टात गेलाय. मनसेनं यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय. काँग्रेसचं विरोधी पक्षनेते पद काढून घ्यावं, अशी मनसेची मागणी आहे.