गृहमंत्री आर. आर. पाटील करणार गुन्हेगारांचा प्रचार?

Last Updated: Friday, June 21, 2013, 11:23

सांगली महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीने गोची केली आहे. आजवर ज्यांना गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरविण्यात आले, अशा गुन्हे नोंद असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिल्याने आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे.

पंढरपुरात वारकरी दूर, व्हिआयपी `पास`!

Last Updated: Friday, June 21, 2013, 10:24

पंढरपूर मदिर समितीनं आषाढीला येणा-या लाखो वारक-यांचा विचार न करता व्हीआयपींच्या दर्शनाची सोय करत असल्याचं उघड झालंय.

पुरानंतर..उपाशीपोटी `ते`गोठवणाऱ्या थंडीत

Last Updated: Thursday, June 20, 2013, 18:32

उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.

कोल्हापूरचा ‘सिरीयल किलर’ सापडला!

Last Updated: Thursday, June 20, 2013, 12:59

कोल्हापूर पोलिसांनी ‘सिरीयल किलिंग’ प्रकरणी एकाला अटक केलीय. ताब्यात घेण्यात आलेला दिलीप लहरी हाच सिरीयल किलर असल्याचा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलाय.

कोल्हापूर सिरीयल किलरचा छडा लावणार मुंबई पोलीस

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 20:44

कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या खून सत्राचा छडा लावण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम उद्या कोल्हापुरात दाखल होणार आहे. त्यामुळं ही टीम आता शोध लावणार का, याची उत्सुकता आहे.

आईनेच केला पोटच्या गोळ्याचा अंत, दिली सुपारी!

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 17:17

सतत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आईनेच सुपारी देऊन मुलाचा खात्मा केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे.

दहशत ‘सीरियल किलर’ची...

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 09:07

तो अंधारातून येतो आणि पुन्हा अंधारात पसार होतो...मागे उरतो एक मृतदेह आणि एक दगड... हे कोल्हापूरातील वास्तव आहे आणि याचमुळे कोल्हापूरात सीरियल किलरची दहशत पसरलीय

मुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचे स्वागत

Last Updated: Monday, June 17, 2013, 15:37

पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी सुखद आश्चर्याचा धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत के्लं.

पुण्यात जोरदार पाऊस

Last Updated: Sunday, June 16, 2013, 19:23

पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरु असून तब्बल 300 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आलीय.

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

Last Updated: Sunday, June 16, 2013, 10:06

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावासाचा पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती.