कोल्हापुरात सिरियल किलरची दहशत

Last Updated: Saturday, June 15, 2013, 23:02

कोल्हापुरात हत्येचं सत्र सुरुच आहे. रेल्वे स्टेशन परिसरात आणखी एका अज्ञाताचा मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट माजलीय. दगडाने ठेचून या इसमाची हत्या करण्यात आलीय.

राजभवनातील चंदनाच्या झाडांची चोरी

Last Updated: Saturday, June 15, 2013, 22:18

पुण्यातल्या राजभवन परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी झालीय. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेले राजभवन हा पुण्यातला अत्यंत सुरक्षित असा भाग मानला जातो.

कोल्हापुरात खतांची कृत्रिम टंचाई, शेतकरी हवालदील

Last Updated: Saturday, June 15, 2013, 21:55

कोल्हापुरात वरुणराजा बरसण्यास सुरुवात झालीय... शेतीच्या कामांनाही वेग आलाय.. मात्र शेतक-यापुढं उभं राहिलंय मोठं संकट... व्यापा-यांनी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यानं बळीराजा अडचणीत सापडलाय..

मुजोर शाळेचा `झी २४ तास`ला धमकावण्याचा प्रयत्न

Last Updated: Saturday, June 15, 2013, 16:59

शिक्षणाचं मंदिर म्हणवणाऱ्या शाळा किती मुजोर आहेत. त्याचं धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आलंय. शहरी भागातल्या शाळांबरोबरच ग्रामीण भागातल्या शाळाही मुजोर होत चालल्यायत. या शाळांच्या मुजोरीबाबत माध्यमांनी आवाज उठवला तर माध्यमांनाच धमकावण्याचा प्रकार घडलाय.

‘चिंटू’कार प्रभाकर वाडेकर यांचे निधन

Last Updated: Saturday, June 15, 2013, 16:30

महाराष्ट्राच्या `चिंटू` या चित्रकथेने घराघऱात पोहचणारे `चिंटू`चे लेखक प्रभाकर वाडेकर यांचे पुण्यात शनिवारी निधन झाले.

पुणेकरांचा जीव धोक्यात!

Last Updated: Thursday, June 13, 2013, 20:44

पुण्यातल्या तब्बल २८ नाल्यांचे प्रवाह बलाण्यात आले आहेत. आणि त्यासाठी महापालिकेनंच परवानगी दिलीय.

कोल्हापूरमध्ये बस चालकांचं काम बंद आंदोलन!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 19:05

कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाकडं भाडेतत्वावर असलेल्या बसच्या चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. त्यामुळं प्रवाशांचे हाल होतायत.

मनसे करतंय विकास आराखड्याविषयी जनजागृती

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 20:10

पुणे शहराचा विकास आराखडा महापालिका सभागृहात आला, तेव्हा इतर पक्षांच्या नगरसेवकांबरोबरच मनसेच्या नगरसेवकांनीही अनेक उपसूचना दिल्या. मात्र आता याच मनसेनं विकास आराखड्याविषयी जनजागृती सुरू केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेचे आरोप!

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 16:20

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते मोशीमध्ये उदघाटन केलेल्या उपबाजार समितीचं बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत.

यंदा पालखीसाठी स्वागत कमानी नाहीत!

Last Updated: Sunday, June 9, 2013, 23:26

पालखीचं स्वागत करण्यासाठी यंदा स्वागत कमानी लावू नयेत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्याच बरोबर पालखी रथावर बसण्याचं मान्यवर लोकांनी टाळावं असाही निर्णय घेण्यात आलाय.