राष्ट्रवादी नेते-मुलांची गुंडागर्दी, पोलिसावर प्राणघातक हल्ला

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 16:39

राज्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मुलांनी उच्छाद मांडलाय. काल धुळ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या दोन मुंलानी एपीआय धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आज पुण्यात अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झालीय.

होळी रे होळी : राज्यभर कोरडी होळी साजरी करण्यावर भर!

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 13:59

राज्यभर धुळवडीचा रंगोत्सव सुरू आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. बहुतेक ठिकाणी जागृत नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प अंमलात आणलेला दिसतोय. कोरडे रंग खेळून तरुणाईसह अबालवृद्धही या रंगोत्सवात न्हाऊन निघालेत..

पवारांच्या तब्येतीच्या कारणामुळे ‘तो’ क्षण हुकला!

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 08:07

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सध्या प्रकृतीच्या अस्वस्थतेच्या कारणास्तव पुण्यात विश्रांतीसाठी थांबण्याचा निर्णय घेतला होता.

पुण्यात मनसेला दुसऱ्यांदा धक्का!

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 23:32

पुण्यात मनसेला दुसरा धक्का बसला आहे. कल्पना बहिरट यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. जातीचा खोटा दाखला दिल्याप्रकरणी आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचं तंत्रज्ञान, सदस्यांचं अज्ञान

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 19:20

कोल्हापूर जिल्हा परिषद हायटेक करण्यासाठी वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून सर्वच सदस्यांना लॅपटॉप देण्यात आले. मात्र सदस्यांना लॅपटॉप वापरण्याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे हे लॅपटॉप वापरावीनाच पडून असल्याचं उघडकीस आलंय.

भाचीचा बलात्कारनंतर खून, मामाला फाशी

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 18:31

भाचीचा बलात्कार करून खून करणा-या मामाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलीय. सदाशिव कांबळे असं या आरोपीचं नाव असून सदाशिवला सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय. आरोपी सदाशिवला खून प्रकरणी फाशी आणि बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.

लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाची आत्महत्या...

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 14:01

पिंपरी-चिंचवडमधल्या भोसरी भागात प्रेमीयुगुलानं आत्महत्या केलीये. विवाहाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

पुण्यात बिल्डिंगला आग, २६ गाड्या जळून खाक

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 13:37

पुण्याच्या कोथरुड परिसरातील त्रिमूर्ती हाइटस या सहा मजली इमारतीच्या पार्कींग मध्ये आज पहाटे आग लागली या आगीत २२ दुचाकी आणि ४ कार जळाल्या.

माजी आमदार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा गुन्हा

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 12:40

`उपरा` या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायमस्वरूपी स्वयंपाकीण म्हणून घेतो असे सांगून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यात मनोरुग्णाचं थैमान...

Last Updated: Monday, March 25, 2013, 22:40

पुण्यामध्ये एका मनोरुग्णाने लोकांची चांगलीच दमछाक केली. रेल्वे गोदामाच्या छतावर चढून बसलेल्या या मनोरुग्णाला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल तसंच रेल्वे पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तब्बल साडेतीन तास चालेलेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात यश आलं.