मतदार नोंदणीला 26 मेपासून सुरूवात

मतदार नोंदणीला 26 मेपासून सुरूवात

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:30

लोकसभेच्या मतदानावेळी अनेक मतदारांची नावे गायब झाल्याने लोकांनी खूपच नाराजी व्यक्त केली होती. पण आता विधानसभेतील निवडणुका जवळ असल्याने २६ मेपासून पुन्हा मतदारनोंदणी सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी ही माहिती दिली.

सर्वाधिक आत्महत्याचं शहर बनलंय पुणे

सर्वाधिक आत्महत्याचं शहर बनलंय पुणे

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 19:37

जगभरात दरवर्षी अंदाजे दहा लाख माणसं आत्महत्या करतात. अनेकदा अशा आत्महत्या तणाव, मानसिक विकार, आर्थिक संकट आणि वैयक्तिक नातेसंबंधातील गुंता यामुळे घडतात. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने बनवलेल्या अहवालात आत्महत्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतंय. या अहवालात पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो.

मनसेचा बालेकिल्ला ढासणार हे समजताच राज नाशिक दौऱ्यावर

मनसेचा बालेकिल्ला ढासणार हे समजताच राज नाशिक दौऱ्यावर

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 17:07

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जादू चालणार नाही, हे सर्वच एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी नाशिक येथे ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतंय.

माझं बंड पवारांविरोधात नाही - दीपक केसरकर

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 16:04

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अडचण टाळण्यासाठीच सिंधुदुर्गातल्या शरद कृषी भवन उद्धघाटनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंच केसरकारांनी कार्यक्रमातून माघार घेतल्याचं मानलं जात होतं.

बाळाचा अमानुष छळ करणाऱ्या बाईला अटक

बाळाचा अमानुष छळ करणाऱ्या बाईला अटक

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 15:35

एका लहानग्याचा छळ करण्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हे वृत्त सगळीकडे पसरताच पोलिसांनी त्या आरोपी महिलेवर अटकेची कारवाई केली. मुलाला सांभाळणाऱ्या बाईनं या मुलाला अमानुषपणे बिनबॅग आणि बेड वर आपटलं होतं.

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 12:18

गंगापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर सख्ख्या भावासह चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिच्या काकाचाही समावशे होता.

कोथिंबीर पिकातून लाखाचं उत्पन्न

कोथिंबीर पिकातून लाखाचं उत्पन्न

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 11:33

बल्हेगाव येथील आबासाहेब जमधडे यांनी एका महिन्यात कोथिंबीरीचं पीक घेऊन 10 गुंठ्यातून सुमारे एक लाखांचं उत्पन्न घेतलंय. अत्यल्प पाण्यावर घेतलेलं हे पीक जमधडे यांना यंदाच्या हंगामात बोनस ठरलंय.

मोदींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपद - रामदास आठवले

मोदींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपद - रामदास आठवले

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 09:55

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळेल, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय. एवढच नाही तर मंत्रीपद मिळ्यानंतर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं साहित्य त्यांच्या बंगल्यातून बाहेर काढू, असं थेट इशारा आठवले यांनी दिलय.

पाहा महिलेकडून बाळाचा छळ

पाहा महिलेकडून बाळाचा छळ

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 23:51

पुण्यात एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं बाहेर आला आहे.

ठाण्यात झोपडीधारकांना बाटली बंद पाणीपुरवठा

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 16:03

झोपडपट्टीतील लोकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी चक्क बाटली बंद पाणी देण्याचा विचार ठाणे महानगरपालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेने ही जबाबदारी खासगी कंपनीच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय केलाय.