महायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात

महायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात

Last Updated: Sunday, February 23, 2014, 23:02

काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.

दहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले

दहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले

Last Updated: Sunday, February 23, 2014, 18:39

संकेत आणि मुज्जफर. शनिवारी सकाळी दहावीच्या निरोप समारंभसाठी आनंदात संकेत आणि मुझफ्फर निघाले. हसतखेळत जात असताना त्रिमूर्ती चौकात त्यांना एका मोपेडचा धक्का लागला. ट्रकखाली चिरडलं गेल्यानं दोघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलीस चौकी असूनही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी कधीही पोलीस नसतात. दरम्यान, परभणीतील विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला.

अरे बापरे..पुण्यात बोअरवेलमध्ये पडला दोन वर्षांचा चिमुरडा

Last Updated: Sunday, February 23, 2014, 18:05

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टाकळीहाजी इथं दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. शुभम मोरे असं या चिमुकल्याचं नाव आहे. एका शेतात शुभमचे वडील ऊसतोडणीसाठी आले होते. त्याचवेळी खेळता खेळता शुभम शेतातल्या दीडशे ते दोनशे फूट खोल उघड्या बोअरवेलमध्ये पडला.

अजित पवार घाबरतात तेव्हा....

Last Updated: Sunday, February 23, 2014, 17:33

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मीडियाचा चांगलाच धसका घेतलाय.. याचीच प्रचिती इंदापूरमधल्या एका कार्यक्रमात आली.. बोलता बोलता एखादा शब्द गेला तर तर माझ्याच शब्दांनी माझी वाट लागते अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतला..

ठाण्यातले स्कायवॉक प्रेमी युगुलांचे अड्डे

ठाण्यातले स्कायवॉक प्रेमी युगुलांचे अड्डे

Last Updated: Sunday, February 23, 2014, 10:16

ठाण्याची शान समजला जाणारा सॅटीस प्रोजेक्ट, त्याच्या आजूबाजूचे स्कायवॉक सध्या प्रेमी युगुलांचे अड्डे बनलेत. त्यामुळे ठाणेकर वैतागलेत.

चार वर्षांच्या चिमुकलीचे `त्यांनी` लचके तोडले

चार वर्षांच्या चिमुकलीचे `त्यांनी` लचके तोडले

Last Updated: Saturday, February 22, 2014, 22:59

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी. चार वर्षांच्या एका चिमुकलीवर एकाचवेळी दहा ते बारा कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झालीय.

शिर्डीनंतर आता परभणीत सेनेला खासदारांचा `दे धक्का`

Last Updated: Saturday, February 22, 2014, 22:10

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुंबईत सत्ता आण्यासाठी शिवबंधन धागा बांधून शपत घेतली होती. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. याआधी शिर्डीचे खासदार यांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर परभणीचे खासदार राष्ट्रवादीच्या गळाला लागलेत.

नानाची चौफेर टोलेबाजी, नेत्यांची मालमत्ता चौपट कशी होते?

Last Updated: Saturday, February 22, 2014, 20:29

सांगलीत अभिनेता नाना पाटेकर याने राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला. नेते निवडून आल्यावर त्यांची मालमत्ता चौपट होते, असल्या नेत्यांना जनतेनं जाब विचारायला हवा, असं नाना म्हणाला. त्यांनी आपल्या नाना-स्टाईलमध्ये मराठी पंतप्रधान का झाला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तीन ठार

Last Updated: Saturday, February 22, 2014, 19:57

पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळ वाशी येथे आज पहाटे कार अपघातात तीन जण ठार झाले आहेत. या अपघातात पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोराडे यांचा मुलगा प्रीतम बोराडे याच्यादेखील मृतांमध्ये समावेश आहे.

औरंगाबादेत काँग्रेस पक्ष निरीक्षकांसमोर हाणामारी

औरंगाबादेत काँग्रेस पक्ष निरीक्षकांसमोर हाणामारी

Last Updated: Saturday, February 22, 2014, 16:12

औरंगाबादेत काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ पहायला मिळाला. काँग्रेसच्या दोन गटांत उमेदवार निवडीवरुन हाणामारी झाली.