आकाशात होणार धूमकेतूची ‘आतषबाजी`!

आकाशात होणार धूमकेतूची ‘आतषबाजी`!

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 13:22

‘शतकातील धूमकेतू’ असं ज्याचं वर्णन करण्यात आलंय, अशा ‘इसॉन’ या धूमकेतूनं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केलाय. त्यामुळं आता जगभरातील खगोलप्रेमींचं लक्ष लागलंय ते आकाशात होणाऱ्या ‘आतषबाजी` कडे.

भारतीय कार्यक्रम दाखवल्यानं पाकिस्तानी चॅनेलला १ कोटी रु. दंड

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 12:43

पाकिस्ताननं त्याचा मनाचा कोतेपणा पुन्हा एकदा दाखवलाय. पाकिस्तानातील दहा चॅनेल्सना भारतीय आणि परकीय भाषेतील जास्त कार्यक्रम दाखवल्याबद्दल १ कोटी रूपये दंड ठोठावण्यात आलाय. पाकिस्तानच्या माध्यम नियंत्रण मंड़ळानं या वाहिन्यांना पत्रं पाठवून दंड भरण्यास सांगितलंय. शिवाय यापुढं भारतीय भाषातील किंवा परदेशी भाषातील कार्यक्रम जास्त प्रमाणात दाखवला तर याद राखा, असा इशाराही दिला आहे.

याला काय म्हणायचं, मुलगी रडली...त्यांनी काढली विकायला

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 08:40

आपलं बाळ कितीही हट्टी असलं किंवा रडलं तरी कोणी ते विकायला काढेल का? नाही ना! परंतु ही वास्तव घटना घडलेय प्रगत अशा अमेरिकेत. अमेरिकेत एक धक्कादायक बाब पुढे आली आहे, बाळ रडलं म्हणून त्याला चक्क विकायला काढलं.

ट्विटरच्या वापरात भारतीय मागे, सौदी अरेबिया अव्वल!

ट्विटरच्या वापरात भारतीय मागे, सौदी अरेबिया अव्वल!

Last Updated: Monday, November 18, 2013, 20:05

सध्या सोशल मीडियाचा वापर भारतात भरपूर होतांना दिसतो. मात्र असं असलं तरी जगात ट्विटरच्या वापरात भारत सध्या मागे असल्याचं एका सर्वेक्षणात पुढं आलंय. जगात ट्विटरच्या वापरात सौदी अरेबियातील नागरिक सर्वात पुढं आहेत.

अखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल

अखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल

Last Updated: Saturday, November 16, 2013, 22:43

खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.

शनी आणि पृथ्वीचा `नासा`नं जाहीर केलेला हा दुर्मिळ फोटो...

शनी आणि पृथ्वीचा `नासा`नं जाहीर केलेला हा दुर्मिळ फोटो...

Last Updated: Thursday, November 14, 2013, 21:44

अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)नं शनी ग्रहाचा एक दुर्मिळ फोटो जाहीर केलाय.

लाखो जोडप्यांना साधला ११/१२/१३ चा मुहूर्त

लाखो जोडप्यांना साधला ११/१२/१३ चा मुहूर्त

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 14:10

११/१२/१३ तारखेचा योग साधून जगभरात लाखो जोडपी विवाहबंधनात अडकली. ही एक खास तारीख मानली जाते. त्यामुळे जगभरातील अनेक जोडप्यांना या दिवशी लग्न करण्याची इच्छा होती. नुसत्या अमेरिकेत या दिवशी लग्न करण्यासाठी २,२६५ जोडप्यांनी नाव नोंदणी केली होती.

मलालाच्या ‘आय एम मलाला’ पुस्तकावर पाक शाळेत बंदी

मलालाच्या ‘आय एम मलाला’ पुस्तकावर पाक शाळेत बंदी

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 12:40

संयुक्त राष्ट्रसंघाने गौरविलेल्या आणि तालिबानी विचारांविरोधात आवाज उठविलेल्या पाकिस्तानी मलाला युसुफजाई हिच्या ‘आय एम मलाला’ पुस्तकावर पाकिस्तान शाळेत बंदी घालण्यात आली आहे.

`हैयान`च्या विनाशकारी तांडवात १० हजार नागरिकांचा मृत्यू

`हैयान`च्या विनाशकारी तांडवात १० हजार नागरिकांचा मृत्यू

Last Updated: Sunday, November 10, 2013, 17:38

फिलिपिन्सला बसलेल्या हैयान या चक्रिवादळानं सुमारे दहा हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला असून वादळानं हजारो जणांना बेघर केलंय. या वादळाचा मोठा फटका मध्यवर्ती फिलिपिन्सलाही बसलाय. आतापर्यंत देशातली ही सर्वात मोठी आपत्ती आहे.

भारतीयांची निराशा: मानसीला मुकुट पटकावण्यात अपयश!

भारतीयांची निराशा: मानसीला मुकुट पटकावण्यात अपयश!

Last Updated: Sunday, November 10, 2013, 07:52

चंद्रपूरची मराठमोळी कन्या मानसी मोघे `मिस युनिव्हर्स` स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होती. मात्र मुकुट पटकावण्यात तिला अपयश आल्यानं भारतीयांची निराशा झाली.