चीनकडून आता भारतीय बनावट नोटा

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 13:33

आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.

ही 'हडळ' नाही!

Last Updated: Monday, July 15, 2013, 16:05

हडळींचे पाय उलटे असल्याची दंतकथा आपण अनेकवेळा ऐकली आहे. पण खरंच उलटे पाय असणारी महिला हडळ असते का? कारण नायजेरियात एक अशी महिला आहे, जिच पाय उलटे आहेत. मात्र ती हडळ नाही.

ध्वनीशास्त्राचे जादुगार अमर बोस कालवश

Last Updated: Sunday, July 14, 2013, 22:05

ध्वनिशास्त्रातला प्रयोगशील जादूगार आणि आवाजाच्या दुनियेतील दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या अमर बोस यांचं अमेरिकेत निधन झालं. ते 83 वर्षांचे होते.

तालिबानी फर्मान; ‘रोजा पाळला नाही तर...’

Last Updated: Sunday, July 14, 2013, 10:04

पवित्र रमजान महिना सुरू झालाय. याच रमजान महिन्यात काय नियम पाळायचे आणि कसं वर्तन ठेवायचं याबद्दल तालिबाननं शनिवारी काही फर्मान सोडलेत.

बोफोर्स घोटाळ्यातला मुख्य आरोपी क्वात्रोची याचं निधन

Last Updated: Saturday, July 13, 2013, 23:46

बोफोर्स घोटाळ्यातला मुख्य आरोपी ओट्टावियो क्वात्रोची याचं निधन झालंय.. इटलीतल्या मिलानमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं क्वात्रोचीचा मृत्यू झाल्याचं वृत्त इटालियन मीडियानं दिलंय. त्याच्या कुटुंबीयांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय.

मलाला `आवाजा`ची जगाला नवी ओळख

Last Updated: Saturday, July 13, 2013, 11:17

मलाला यूसुफजई हे नाव गेल्या वर्षी जगभरात चर्चेत आलं. पाकिस्तानमध्ये मुलींना शिक्षणावर बंदी घालण्याच्या विरोधात उठलेला हा एक चिमुकला आवाज. तो आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला. पण आज त्या आवाजाला नवी ओळख मिळालीय.

मलाला संयुक्त राष्ट्रात बोलली, अन् सर्व अचंबित झालेत!

Last Updated: Saturday, July 13, 2013, 09:32

प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. जगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते, असे उद्गार मलाला यूसुफजई हिने काढले.

एका वर्षाच्या चिमुकलीची ‘स्मार्ट’ कार खरेदी

Last Updated: Friday, July 12, 2013, 18:56

एका वर्षाच्या मुलीने केलीय स्मार्टफोनवरून कार खरेदी. खरंतर ही खरेदी चुकीने झाली होती मात्र मुलीचे वडील आता ही कार विकत घेतायत.

सविताच्या मृत्यूनंतर आयर्लंडमध्ये गर्भपाताला मान्यता

Last Updated: Sunday, July 14, 2013, 08:18

आयर्लंडमध्ये गर्भपाताचा कायदा नसल्यामुळे गेल्या वर्षी भारताची सविता हलप्पनावर हिला जीव गमवावा लागला होता. याच धर्तीवर आयर्लंडच्या संसदेमध्ये काल या गर्भपात कायद्याला अनुमती देण्यात आलीय

स्नोडेन व्हेनेझुएलाला आश्रय घेण्यास तयार?

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 17:03

अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड केल्याप्रकरणी तसंच अनेक गोपनीय दस्तावेज जाहीर करणारा स्नोडेन अखेर व्हेनेझुएलामध्ये राजनैतिक शरण जायला तयार झालाय अशी माहिती रशियन संसदेने पुरवलीय.