`या, मला आपल्याशी बोलायचंय`, अशी हाक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला घातलीय. नेहमी खळ्ळ खट्ट्याकची भाषा वापरणारे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवामुळं `थंड` पडल्याचं दिसतंय.
शिवसेनेचे नाराज मंत्री अनंत गिते यांनी अखेर आज आपल्या अजवड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले तरी शिवसेनेला एकच मंत्रीपद ते ही मोठं नाही, त्यामुळं शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाराज झाले होते.
कलम 370 वरून पंतप्रधान कार्यालय विरूद्ध जम्मू काश्मीर सरकार असा संघर्ष सुरू झालाय.
आज सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी मोदींच्या कॅबिनेटनं एक दणका देणारा निर्णय घेतलाय. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात देश- विदेशातील मान्यवरांना सन्मानाचं स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा मात्र अवमान करण्यात आल्याची चर्चा राज्यात सुरू होती.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता केवळ पाच महिने उरले असताना राज्यात महायुती कुणाच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढवणार? असा प्रश्न निर्माण झालाय.
मोदी मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार हातात घेणाऱ्या सुषमा स्वराज या ‘देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री’ ठरल्यात.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जे लुझर्स होते, ते मंत्रिमंडळात सर्वात मोठे गेनर्स ठरले आहेत.
कॅबिनेट मंत्री उमा भारती यांनी सोमवारी ‘चुकून’ ट्विटरवर आपल्याला मिळालेल्या मंत्रालयाची घोषणा करून टाकली.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांच्या समावेश आहे, यातील सहा महिला खासदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्री अनंत गितेंमध्ये बैठक सुरू आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 18 जागा मिळूनही तुलनेनं कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं शिवसेना नाराज आहे.
काँग्रेसचे चार मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यात नारायण राणे, पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांचा समावेश आहे.
थोड्याच वेळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट होणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे.
अरूण जेटली यांनी अर्थ, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची अधिकृत घोषणा झाली आहे. राजनाथ सिंह यांना गृहविभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मेसेज पाठवणाऱ्या एका तरूणाला अटक करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांनीही वडनगरमध्ये घरात बसून नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. हिराबा यांच्यासोबत मोदींचे सर्व कुटुंबियही उपस्थित होते. मोदींचे भाऊ पंकज यांच्या डोळ्यात याक्षणी आनंदाश्रू तरळले.
भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला एनडीएचा सर्वांत जुना घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. मात्र त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना समारंभाचं निमंत्रणच नव्हतं.
मै नरेंद्र दामोदरदास मोदी... हे वाक्य आज राष्ट्रपती भवनात दणाणलं आणि देशाच्या 15व्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. मोदी पंतप्रधान होताच पंतप्रधान कार्यलायची वेबसाईट www.pmindia.nic.in बदलली. नरेंद्र मोदींचा फोटो आणि नरेंद्र मोदींची संपूर्ण माहिती यात देण्यात आली.
मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्मृति इराणी सर्वात तरुण मंत्री आहेत. तर नजमा हेपतुल्ला या सर्वाधिक वयाच्या मंत्री आहेत... विशेष म्हणजे या दोघीही राज्यसभेच्या खासदार आहेत... मोदींच्या या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ वर्षं आहे...
भारताच्या 15व्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलीय. या शपथविधी समारंभाला 4000 निमंत्रित उपस्थित होते. सार्कच्या प्रतिनिधी राष्ट्राच्या प्रमुखांसह देशातील नेते, सेलिब्रेटीही उपस्थित होते. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे रामदास आठवले हे मात्र शपथविधी समारंभाला गैरहजर राहिले.
कर्नाटकच्या समुद्र किनारी असलेल्या भटकळ या गावातून 25 वर्षांच्या एमबीएच्या विद्यार्थ्यासह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना भावी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर आपत्तिजनक एमएमएस प्रसार केल्याबद्दल अटक करण्यात आले.
आम चुनाव 2014