लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये मतमतांतरे दिसून येतायेत.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं सत्ताधारी जेडीयू म्हणजे जनता दल युनायडेला बिनशर्त पाठींबा दिलाय.
भाजपच्या पावलावर पाऊल ठेऊन आता राष्ट्रवादीही सोशल मीडियाच्या प्रचारावर भर देणार आहे.
भारतीय जनता पक्षाने जसे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित केले, त्याच प्रमाणे राज ठाकरे नाव राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषीत करा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज येथे केली.
काँग्रेसचे माजी खासदार आणि राहुल गांधींच्या टीममधले मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या अपयशाचं खापर त्यांनी राहुल गांधी यांना सल्ला देणार्या काँग्रेसच्या नेत्यांवरच फोडलं आहे.
नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या आईने नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर हात फिरवला. तसेच नरेंद्र मोदी यांना 101 रूपये भेटही दिले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणारं एनडीए सरकार लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे लवकरच, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वडेरा यांना मिळणाऱ्या सगळ्या सोई-सवलती आता काढून येण्याची चिन्ह दिसत आहेत.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशांतील नेत्यांना आमंत्रण धाडली गेली आहेत.
अभिनेत्री हेमा मालिलीनी मथुरामधून निवडून आल्या आहेत, त्या आता मतदारसंघात फिरकणार नाहीत, असं कुणी म्हणत असेल, तर ते चुकीचं आहे.
राम मंदिर उभारण्याबरोबरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्याची मागणी वाघेलांनी मोदींकडे केली आहे.
नरेंद्र मोदी यांच्याविषयी गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी लक्ष्मणराव इनामदारांच्या तालमीत आपण आणि मोदी तयार झाल्याची आठवणही वाघेलांनी सांगितली.
मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोर जावं लागल्यानंतर आता अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित व्हायला लागलंय.
विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईत जास्त जागांची मागणी भाजपनं केली आहे. याबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दुजोरा दिला असून ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येईल. तसंच याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं शेलार म्हणाले.
कोकणात झालेल्या पराभवानंतर नारायण राणेंनी राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांवरचा दबाव वाढवलाय. राजीनामा स्वीकारलेला नसतानाही आजच्या बैठकीला राणेंनी दांडी मारुन हा दबाव आणखी वाढवलाय.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आलीय.
आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री असतील, नरेंद्र मोदी हे सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, यानंतर गुजरातचं मुख्यमंत्रीपद आनंदीबेन पटेल पाहणार आहेत.
नरेंद्र मोदी हे भारतातच नाही परदेशामध्येही तितकेच प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणता नेता प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स आणि शेअरिंग बघता मोदी जगात दुसऱ्या नंबरवर आहेत.
गुजरात विधानसभेत बुधवारी विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सेंडऑफ देण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले. मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. मोदी बुधवारी सकाळी गुजरात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहचले.
नरेंद्र मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत, यानंतर ते सेव्हन रेसकोर्स रोडवर राहणार आहेत. येथे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा असणार आहेत.
केंद्रात एनडीएचे सरकार असले तरी महाष्ट्रात हे शिवसेना-भाजप आघाडीचे असेल. मात्र, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘एनडीए’च्या बैठकीनिमित्त उद्धव ठाकरे राजधानीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
पंतप्रधानपदासाठी ‘एनडीए’नं अधिकृतरित्या नरेंद्र मोदींचं नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. त्यामुळे, आता मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीय.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएचं सरकार लवकरच आपापल्या जागा घेणार आहे... पण, यामुळे भारत-पाकिस्तानमधले क्रिकेट संबंध कायमचे संपुष्टात येणार का? हा प्रश्न निर्माण झालाय तो उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्यामुळे...
आम चुनाव 2014