नागपूरमध्ये काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार आणि `आप`च्या अंजली दमानिया यांना मागे टाकत भाजपच्या नितीन गडकरींनी बाजी मारल्याचं चित्र दिसतंय.
केंद्रात नरेंद्र मोदी भाजपला मिळत असलेल्या भरघोस यशानंतर आता सेन्सेक्सनंही उसळी घेतलीय. भाजपच्या कमळाप्रमाणेच शेअर बाजारही भलताच फुललाय.
सुप्रिया सुळे सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत, त्यांना बारामतीतून आघाडी मिळाली असली तरी, दौंड, पुरंदरमधून त्यांचं मताधिक्य कमी होतांना दिसतंय
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे बडोद्यातून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या मधूसूदन मिस्त्री यांना ४ लाख पेक्षा जास्त मतांनी पराभूत केलं.
देशात कोण आहे आघाडीवर, कोण पिछाडीवर
राज्यातील 48 जागांपैकी 22 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर शिवसेना 19, राष्ट्रवादी 5 तर काँग्रेस अवघ्या 1 जागेवर आघाडीवर आहे.
आज 16व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होतेय. एक्झिट पोलच्या निकालांनंतर नरेंद्र मोदींचं सरकार येणार, असंच बोललं जातंय. नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान बनल्यानंतर बॉलिवूडमधून आपले नेते निवडायचे असतील तर ते कोणाला निवडतील?
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा अखेरचा टप्पा आज रंगतोय. अर्थातच, हा टप्पा आहे निकालाचा...
लोकसभा निवडणूक 2014 चा अंतिम टप्पा... म्हणजेच निकाल... देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निकालाची प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे.
तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा निकाल अधिक जलद गतीने पाहता यावा, यासाठी झी 24 तासने एक विशेष पेज 16 मे या दिवसासाठी तयार केलं आहे.
लोकसभा निडणुकांचे निकाल हातीच्या एक दिवस अगोदर काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी इतर पक्षांसमोर एक प्रस्ताव ठेवलाय.
भारतात ८० कोटी पेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं आहे, हे मतदान नऊ टप्प्यात दोन महिन्यात घेण्यात आलं. यावेळी सोशल आणि डिजिटल म्हणजेच न्यू मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
16 मे रोजी निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत. मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे, यानंतर काही वेळाने कोणता उमेदवार आघाडीवर हे ही समजण्यास सुरूवात होईल.
भाजप नेते अमित शाह नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जातात... नरेंद्र मोदींची जवळीक इतरांपेक्षा अमित शहांकडे थोडी जास्तच आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांना लॉटरीच लागण्याची चिन्ह दिसतायत.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं करायचं काय, असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या भाजपला आणि संघाला पडलंय. तर सरकारमध्ये नंबर दोनची पोझिशन राजनाथ सिंहांना हवीय, असं बोललं जातंय.
देशात कुणाची सत्ता येणार याचा निकाल लागण्यासाठी आत काही तासच उरले असतान मोदींच्या फॅन्सची विजयाची तयारी सुरु झालीय.
आम चुनाव 2014