Last Updated: Friday, October 11, 2013, 23:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘बाळासाहेबांसारखं नेतृत्व असतं, तर एव्हाना स्मारक झालं असतं’ असं म्हणत मनोहर जोशींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच टोला हाणलाय.
स्मारकाच्या मुद्द्यावरुन बाळासाहेबांनी सरकारही पाडलं असतं, असंही मनोहर जोशी म्हणाले. त्याचबरोबर बाहेरचा उमेदवार दिला म्हणूनच दादरमध्ये शिवसेनेचा पराभव झाला, असं म्हणत मनोहर जोशींनी उद्धव ठाकरेंचे कानही टोचलेत. नुकताच दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन शिवसेनेत जोशी विरुद्ध शेवाळे असा वाद उफाळून आला होता. या वादात राहुल शेवाळेंनी बाजी मारल्याचं दिसतंय. त्यानंतर मनोहर जोशी नाराज दिसत आहेत. शेवाळेंची जोरदार पोस्टर लागल्यामुळे मनोहर जोशी अस्वस्थ झाले होते.
राज आणि उद्धव एकत्र येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आणि एवढ्यात निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचंही मनोहर जोशींनी स्पष्ट केलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, October 11, 2013, 23:20