Last Updated: Tuesday, October 15, 2013, 19:47
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेनेतल्या मनोहर जोशी मानापमान नाट्यावर कधीकाळी शिवसैनिक असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केलाय. “पदांसाठी अपमान सहन करत राहणं हा जोशींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो ते सहन करत राहणारच, असा वार राणेंनी जोशींवर केला.”
शिवाय बाळासाहेबांनी जोशींवर प्रत्येक वेळी विश्वास टाकला आणि त्यांनी मात्र कायम विश्वासघात केला, असंही राणे म्हणाले. सरांनी आयुष्यभर सहकाऱ्यांना सुरुंग लावला आणि शेवटी उद्धवनी त्यांनाच सुरूंग लावला, असा टोला नारायण राणेंनी लगावलाय.
मात्र तर बाळासाहेब असते तर त्यांचा असा अपमान झाला नसता. बंद खोलीत बोलले असते, साहेबांमध्ये आणि आताच्या सेना नेतृत्वामध्ये हाच फरक आहे. हा शिवसैनिकांच्या नव्हे, तर बाळासाहेबांच्या मनातला कार्याध्यक्ष आहे, असा टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून लगावला.
मी स्वत: सोडून इतर सगळे शिवसेना सोडून गेले तरी चालतील अशी या कार्याध्यक्षांची भूमिका आहे, असंही राणे म्हणाले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा एक्स्लुझिव्ह व्हिडिओ
First Published: Tuesday, October 15, 2013, 19:39