बॉलिवूडचे सुपर ‘डॅड’!
अनेक मुलांसाठी त्यांचे वडील खूप व्यस्त असल्यामुळे भेटत देखील नाही. लहान मुलांना जेवढी आपल्या आईची गरज असते तेवढीच ती वडिलांचीही असते. त्यांच्या भविष्यासाठी वडिलांचीही तितकीच गरज असते. हीच परिस्थिती बॉलिवूड स्टार्सच्या चिमुकल्यांचीही... हे कलाकार आपल्या बिझी शेड्यूल्डमधून मुलं, पत्नीसाठी वेळ काढतातच... असेच काही बॉलिवूडचे सुपर डॅड पाहूयात!
आमीर खान
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा एक परफेक्ट डॅड आहे. आपली मुलं जुनैद, इरा (पहिल्या पत्नी रीना दत्तापासून झालेले) आणि नवजात आझाद राव खान (किरण रावचा मुलगा)चा आमीर प्रेमळ पिता आहे. आपल्या कामासोबत बॅलेंस करत या तिघांनाही तो प्रेमानं सांभाळत असतो.
शाहरूख खान
बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान आपल्या मुलांची आर्यन, सुहाना आणि अबरामची खूप काळजी घेतो. आपल्या मुलांबद्दलच्या फिलिंग्ज तो सोशल नेटवर्किंग साईटवर (फेसबुक आणि ट्विटर) वर खुल्या मनानं सांगतो. त्याचा रा-वन हा चित्रपट खास मुलांसाठीच बनवला होता, असंही सांगण्यात येतंय.
हा सुपर डॅड आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करतो. मग ते लेडी गागाच्या शेड्स मुलगी सुहानासाठी आणणं असो किंवा ग्रेट खली सोबत घरी मिटिंग अरेंज करणं असो.
शाहरुख आणि गौरी खान यांच्या कुटुंबात नुकताच अबराम याची एंट्री झालीय.
अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनला इतका आनंद कधीच झाला नव्हता जितका नोव्हेंबर 2011मध्ये आराध्याच्या जन्मानंतर झाला. अगदी सर्वांनाच माहितीय की, अभिषेक खूप प्रेमळ पिता आहे. मध्यरात्री उठून तो आपल्या मुलीचे नॅपीही बदलतो, ते ही आनंदानं...
अक्षय कुमार
अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी. अक्षय खूप जबाबदार पिता आहे. आरव आणि नितारा अशी दोन मुलं त्याला आहेत. अक्षयचं आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे. त्यानं आपल्या मुलाचं आरवचं नाव चक्क पाठीवर गोंदवलंय.
अजय देवगण
अजय देवगण न्यासा आणि युग या दोन चिमुकल्यांचा पिता आहे. तो खूप व्यस्त असला तरी मुलांसोबत योग्य वेळ घालवतो. गोव्यात शूटिंगनंतर तो बेबीसिंटिंगही करतांना दिसतो. तसंच मुलांची गोष्टीचे पुस्तकंही तो वाचून दाखवतो.
अर्जुन रामपाल
अर्जुन रामपालच्या मुली मायरा आणि महिका या त्याचे दोन डोळेच आहे. आपल्या दोन्ही मुलींची नावं त्यानं आपल्या हातावर लिहीलेले आहेत.
सैफ अली खान
कितीही बिझी असला तरी नवाब खान त्याच्या मुलांना अंतर देत नाही. आपल्या हेक्टिक शेड्युल्डमध्येही त्याच्यातला प्रेमळ पिता जपलेला आहे. इब्राहिम आणि सारा (पहिली पत्नी अमृता सिहंची मुलं) या आपल्या मुलांसाठी छोटे नवाब काहीही करायला तयार असतात. तो आपल्या मुलांच्या चॉईसमध्ये कधीच येत नाही. त्याच्या चित्रपट स्क्रीनिंगला बहुतेक वेळा मुलं सैफू सोबत असतात.
/marathi/slideshow/बॉलिवूडचे-सुपर-डॅड_334.html/16