एँड्रयू सायमंड
२०१२ या वर्षात अनेक दिग्गज खेळाडूंनी आतंरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर एँड्रयू सायमंडने व्यावसयिक क्रिकेटने निवृत्ती घेतली. सायमंडने परिवाराच्या वैयक्तिक कारणांमुळे निवृत्त घेत असल्याचे कारण सायमंडने दिले. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये जन्म झालेला सायमंडने ऑस्ट्रेलियासाठी २६ टेस्ट, १९८ वनडे आणि १४ टी-२० आतंराष्ट्रीय मॅचमध्ये सहभागी होता. सायमंडने २६ टेस्टमध्ये १४६२ रन केले आणि त्याचसोबत १२४ विकेटही घेतल्या.
तर १९८ वनडे मॅचमध्ये ५०८८ रनचा टप्पा पार केला होता. आणि १३३ विकेट मिळविले होते. आता २०१२ मध्ये अनेक क्रिकेटर्सने निवृत्ती घेतली होती. कोण होते हे खेळाडू ? पाहूया स्लाईड शोच्या माध्यमातून....
राहुल द्रविड
क्रिकेटच्या इतिहासातील एक महान नाव म्हणजे भारतीय क्रिकेट भिंत आणि तो म्हणजे राहुल द्रविड हा होय. आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटला २०१२ मध्ये त्याने अलविदा केला. १९९६ मध्ये ऐतिहासिक लॉर्डसवर पदार्पणातच टेस्टमध्ये शानदार ९५ रन बनविणारा द्रविडची तुलना महान खेळाडूंशी झाली. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांच्या पिढीतील द्रविडपेक्षा चागलं तंत्रशुद्ध बॅटींग करणारा एकही फंलदाज नव्हता ह्याची आपल्याला दखल घ्यावीच लागेल. द्रविडने आपल्या शानदार करिअरमध्ये १६४ टेस्टमध्ये ५२.३१ च्या सरासरीने ३६ शतके आणि ६३ अर्धशतके केली होती. तसेच त्याने २१० कॅच पकडून विश्वरेकॉर्डही रचला आहे. तर वन-डे मध्ये ३४४ मॅचमध्ये ३९.१६ च्या सरासरीने १०८८९ रन केले. ज्यात १२ शतकं आणि ८३ अर्धशतकांचा समावेश आहे.
वन-डेमध्ये त्याने अनेक काळ विकेटकिंपींगची जबाबदारी सर्मथपणे संभाळली. ज्यात त्याने ११४ कॅच पकडल्या होत्या. तर १४ स्टंपिंग विकेट घेतल्या होत्या.
ब्रेट ली
आपल्या वेगाने तमाम फंलदाजांच्या छातीत धडकी भरविणारा ऑस्ट्रेलियाचा द्रूतगती गोलंदाज ब्रेट ली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र आयपीएल आणि बिग बॅश यासारख्या टी-२० टूर्नामेंटमध्ये खेळणं सुरूच आहे.
३५ वर्षीय ब्रेट लीने ७६ टेस्ट मॅचमध्ये ३०.८१च्या सरासरीने ३१० विकेट घेतल्या आहेत. तर वन-डे मध्ये २२१ मॅचमध्ये २३.३६च्या सरासरीने ३८० विकेट घेतल्या.
मार्क बाऊचर
क्रिकेटमध्ये नर्वस नाईंटीचे अनेक खेळाडू शिकार होतात. मात्र डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा विश्वरेकॉर्डधारी विकेटकिपर मार्क बाऊचर ९९९चा शिकार झाला.
बाऊचरने दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. बाऊचरने १४७ टेस्टमध्ये ५५५ विकेट, २९५ वन-डेमध्ये ४२५ विकेट तर २५ टी-२० मध्ये १९ विकेट घेतल्या होत्या आणि या सगळ्याचा एकूण आकडा म्हणजे ९९९ इतका होय. त्यामुळे बाऊचर ९९९चा शिकार झाला मात्र हा एक आगळावेगळा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.
मार्क रामप्रकाश
इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी फलंदाज मार्कं रामप्रकाशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ४२ वर्षीय रामप्रकाशने टीममध्ये निवड न झाल्याने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. १९८७ मध्ये मिडलसेक्स पासून त्याने आपल्या करिअरची सुरवात केली. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख बनविण्यात तो अपयशी ठरला. १८ वन-डे आतंरराष्ट्रीय मॅच खेळला आहे.
रामप्रकाशने २००६ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकटे खेळताना नॉर्थहॅम्शायरतर्फे ३०१ रनची शानदार खेळी केली होती. जी त्याच्या काही खेळींपैकी महत्त्वाची मानली जाते.
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
भारतीय क्रिकेटचा संकटमोचक आणि सगळ्यात स्टायलिश बॅट्समन व्ही. व्ही. एसस लक्ष्मणने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत. आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. आणि त्याचसोबत कलात्मक बॅटींगचं एक युग जवळजवळ संपलं. भारतीय कितीतरी अविस्मरणीय खेळी खेळणाऱ्या लक्ष्मणनने आपलं करिअर १९९६मध्ये द. आफ्रिकेविरूद्ध सुरू केलं. त्याने १३४ टेस्ट मॅचमध्ये ८७८१ रन बनविले.
ज्यात १७ शतकं आणि ५६ अर्धशतकांचा समावेश होता. लक्ष्मणनने ८६ वन-डे मध्ये सहा शतकांसह २३३८ रन केले होते. लक्ष्मणनने शेवटची वन-डे २००६ मध्ये खेळली होती. त्याची १००वी टेस्ट मॅच २००८ मध्ये नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरूध्द झाली होती.
एंड्रयू स्ट्रॉस
इंग्लंडला टेस्ट रॅकिंगमध्ये नंबर एक बनविणारा आणि लागोपाठ दोन एँशेज सीरिज जिंकून देणारा कॅप्टन एंड्रयू स्ट्रॉसने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्ट्रॉसने २००४ मध्ये आपलं टेस्ट करिअर सुरू केलं. त्याने १०० टेस्टमध्ये ४०.९१च्या सरासरीने एकूण ७०३७ रन बनविले. त्याच्या खात्यात २१ टेस्ट शतकं आहेत, जे की एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे.
स्ट्रॉसने एकूण ५० टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आणि ज्यात २४ मॅच जिंकण्यात त्याला यशही आलं आहे.
मॅथ्यू हेडन
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीचा धडाकेबाज असा मॅथ्यू हेडनने या वर्षी क्रिकेटच्या सगळ्या प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. तसेच कोणत्याही टी-२० लीगमध्येही खेळणार नसल्याने त्याने स्पष्ट केलं आहे. हेडनने १०३ टेस्ट मॅचमध्ये ८६२५ रन बनविले ज्यात ३० शतकांचा समावेळ आहे.
त्याचसोबत १६१ वन-डे मॅचमध्येही त्याने ऑस्ट्रेलियाकडून नेतृत्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर हेडन आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज कडून खेळला होता.
सौरभ गांगुली
नेहमीच चर्चेत राहणारा बंगालचा ‘रॉयल बंगाल टायगर’ सौरभ गांगुलीने शेवटपर्यंत मैदानात बॅट घेऊन राहण्याचा बालहट्ट सोडून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी सत्रात न खेळण्याचा त्याने निर्णय घेतला आहे.
याचसोबत गांगुलीने जवळजवळ २२ वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर ह्या तळपत्या सूर्याची अखेर अस्त झाला आहे. सौरभ गांगुलीने केलेली कॅप्टनशीप नेहमीच साऱ्यांच्या लक्षात राहिल.
रिकी पाँण्टिंग
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर आणि माजी कॅप्टन रिकी पाँण्टिंगने आपल्या १७ वर्षीय शानदार आणि अविश्वसनीय क्रिकेट करिअरवर विराम लागला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पर्थमध्ये आपली शेवटची टेस्ट खेळून त्याने निवृत्ती घेतली.
पाँण्टींगने वन-डेमध्ये ३० शतकं आणि ८२ अर्धशतकं केली, तर टेस्ट मॅचमध्ये त्याने ४२ शतकं आणि ६२ अर्धशतकं केली होती. आणि याच वर्षी त्याने जानेवारीमध्ये वन-डेमधून ही निवृत्ती घेतली होती.
/marathi/slideshow/या-क्रिकेटपट्टूंनी-म्हटले-क्रिकेटला-बाय-बाय_175.html/16