दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी

Last Updated: Monday, October 28, 2013, 09:57

रायगड दिवेआगर इथलं सुवर्ण गणेश मंदिर नव्यानं बांधण्यासाठी अखेर मोक्का न्यायालयाची परवानगी मिळालीय. २४ मार्च २०१२ला या मंदिरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम सोन्याचा गणेश मुखवटा आणि काही अलंकार लंपास केले होते. यावेळी २ पहारेकर्‍यांनाही ठार मारण्यात आलं होतं.

आजही दिवेआगर गणपतीच्या प्रतिक्षेत

Last Updated: Sunday, March 24, 2013, 18:52

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश मंदिरावरती पडलेल्य़ा दरोड्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात ना देव देव्हाऱ्यात आला ना मंदिर उभ राहू शकलं आहे.

दिवेआगरमध्ये नवे बाप्पा, नवं मंदिर

Last Updated: Sunday, May 6, 2012, 17:20

दिवेआगरमध्ये गणेशाची मूर्ती सोन्याचीच बसवण्यात येणार आहे. लोकसहभागातून ही मूर्ती बसवण्याचा निर्णय झाला आहे. सुवर्ण गणेशाच्या जागेवरच ही नवी मूर्ती बसवण्यात येईल.

सुवर्णगणेश चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक

Last Updated: Saturday, May 5, 2012, 23:49

दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. दरोड्यातील मुख्य सूत्रधार विक्रम भोसले याला पोलिसांनी अटक केलीय. विक्रम भोसलेसह नवनाथ भोसलेची 11 मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीये.

पर्यटकांनी केली गणेश मृर्तीची चोरी

Last Updated: Saturday, May 5, 2012, 12:33

रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या सुवर्णगणेश मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीये. चोरटे पर्यटक म्हणून आले आणि चोरी करुन गेले अशी माहिती समोर येत आली आहे.

ग्रामसभा उधळली, बाप्पा राहिले अधांतरी...

Last Updated: Thursday, May 3, 2012, 16:42

दिवेआगरमध्ये नवीन गणेशमूर्तीच्या निर्णयासाठी बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत जोरदार गोँधळ झाला आहे. मंदिराचे विश्वस्त मंडळाचे सदस्य या ग्रामसभेला अनुपस्थित राहिले आहेत.

दिवेआगर मंदिरात बाप्पा होणार विराजमान?

Last Updated: Thursday, May 3, 2012, 10:18

रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरातील गणेशमूर्तीप्रमाणेच हुबहुब चांदीची मूर्ती पुण्यातील सराफ जितेंद्र घोडके यांनी तयार केली आहे.

दिवेआगर चोरी : चोरांचा लागला छडा

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 09:46

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गणेशमूर्तीचे अवशेष आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दिवेआगर चोरी : गुजरातमधून प्रमुखाला अटक

Last Updated: Saturday, April 21, 2012, 10:06

दिवेआगारमधील सुवर्णगणेमूर्ती चोरीप्रकरणी गुजरातमधून मुख्य संशयिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलय. याशिवाय औरंगाबादमध्येही सात जणांची चौकशी सुरू आहे. हे सातही जण फासेपारधी आहेत.

रायगड दरोडा : दिवेआगर ग्रामस्थांचा मोर्चा

Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:59

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला पंधरवडा उलटूनही पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघीसागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

'रुपनारायण' मंदिराला सुरक्षा

Last Updated: Saturday, March 31, 2012, 18:43

दिवेआगरमधल्या सुवर्ण गणेश मंदिरात चोरीच्या घटनेचा अजून तपास लागलेला नाही. त्यानंतर गावात इतर काही महत्त्वाच्या मंदिरांना सुरक्षा देण्यात आलीय. त्यात रुपनारायण मंदिराला सुरक्षा देण्यात आली आहे. हजारो वर्षांपुर्वीच्या रुपनारायण मंदिरात दुर्मिळ शिल्प आहे.

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे

Last Updated: Friday, March 30, 2012, 20:37

शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.

युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

Last Updated: Friday, March 30, 2012, 14:32

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दिवेआगर चोरी: विधानसभेत सेनेचा गोंधळ

Last Updated: Friday, March 30, 2012, 13:14

रायगडमधील दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातून सोन्याची दीड किलोवजनाची मूर्तीची चोरी झाली. मात्र, या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे शिवसनेने रायगड बंदची हाक दिल्यानंतर राज्यात घंटानाद आंदोलन केले. आज विधानसभा परिसरात आरती करून अधिक आक्रमकपणी स्वीकारला. चोरीचा तपास लावण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे अर्धातास कामकाज तहकूब करावे लागले.

दिवेआगर मंदिर दरोडा : उद्धव मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 20:30

दिवेआगरच्या गणेश मूर्ती चोरीप्रकरणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली. विधिमंडळाचं कामकाज सुरु असल्यानं त्यांनी विधिमंडळात जाऊन त्यांची भेट घेतली.