बेपत्ता मलेशिया विमानाचे अवशेष सापडल्याचा दावा

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 17:28

ऑस्ट्रेलियाच्या सागरी मोहिम कंपनीनं बंगालच्या उपसागरात बेपत्ता मलेशिया विमानाचा मलबा सापडल्याचा दावा केलाय. ही जागा सध्या हिंदी महासागरात सुरू असलेल्या तपासापासून ५,००० किलोमीटर दूर आहे.

ऑस्ट्रेलियाचा सर्वांत जुना तारा शोधल्याचा दावा

Last Updated: Monday, February 10, 2014, 20:11

ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, जगातल्या सर्वांत जुन्या ताऱ्याचा शोध लागलाय. `एएनयू` म्हणजेच `ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी`नं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सोमवारी सर्वांत जुना तारा शोधण्यात आल्याचा दावा केलाय.

टेनिसफॅन्सच्या मुखी एकच नाव... ली ना ओेss ली ना!

Last Updated: Saturday, January 25, 2014, 19:27

चीनच्या ली ना हिने ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. चौथ्या सीडेड ली नाने फायनलमध्ये स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाला ७-६, ६-० नं पराभूत करत आपल्या करियरमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.

फेडररची घोडदौड थांबवत नडाल फायनलमध्ये

Last Updated: Friday, January 24, 2014, 18:00

जगातला नंबर एक खेळाडू स्पेनच्या राफेल नडालने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसमध्ये रॉजर फेडररची विजयी घोडदौड अखेर थांबवली आहे.

पारंपरिक प्रतिस्पर्धी फेडरर - नदाल पुन्हा एकदा आमने-सामने

Last Updated: Thursday, January 23, 2014, 12:40

पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे फेडरर आणि राफेल नदाल आमने-सामने येणार आहेत.

ऑस्ट्रेलियन ओपन : फेडररने मरेला हरवलं

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 21:54

ऑस्ट्रेलियन ओपनचा चार वेळेस विजेता असलेल्या रोजर फेडररने, वर्षातल्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या क्वार्टर फायनलमध्ये अॅण्डी मरेला पराभूत केलं आहे.

चॅम्पियन जोकोविच `ऑस्ट्रेलियन ओपन`मधून बाहेर

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 20:33

ऑस्ट्रेलियन ओपनचा तीन वेळेस चॅम्पियन असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच पराभूत झालाय. जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडलाय.

‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या घमासानाला सुरुवात

Last Updated: Monday, January 13, 2014, 08:57

ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातल्या पहिल्या ग्रॅँड स्लॅम स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या हार्डकोर्टावर होणाऱ्या या स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचं आणि अग्रमानांकीत राफेल नदाल यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियातील बलात्कार प्रकरणी भारतीय डॉक्टर दोषी

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 10:24

दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय डॉक्टीरला मेलबर्न कोर्टानं आज दोषी ठरविलंय. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सॅनबरी मेडिकल क्लिीनिकमध्ये तपासणीसाठी आलेल्या दोन महिलांवर मनू मैमंबिल्ली गोपाल या ३९ वर्षीय डॉक्टरनं बलात्कार केल्याचा आरोप आहे.

क्रिकेटची डीआरएस सिस्टिम वादग्रस्त

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 21:38

`डीआरएस`सिस्टिम सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे. खास करुन ऍशेस सीरिजमध्ये अंपायर्स आणि `डीआरएस`द्वारे दिलेल्या निर्णय यामुळेच सीरिज गाजत आहे.

ऑसींचे बॅड लक, मेहनतीवर `पाणी`

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 07:38

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेसमधील तिसरी टेस्ट पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर ड्रॉ झाली.

सुश्मिता सेनशी नाही, ऑसी ललनेशी अक्रमचे लग्न!

Last Updated: Monday, July 8, 2013, 16:13

वसीम अक्रम आणि सुश्मिता सेन यांचे सूत जुळले आणि ते लग्न करणार अशा अफवा गेल्या काही महिन्यांपूर्वी पसरल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांना फाटा देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने रिव्हर्स स्वींग टाकला आहे.

जोकोविच ठरला ‘ऑस्ट्रेलियन ओपन’चा हिरो!

Last Updated: Monday, January 28, 2013, 09:34

सर्बियाच्या अव्वल सीडेड नोव्हाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. त्यानं ब्रिटनच्या अँडी मरेवर ६-७, ७-६, ६-३, ६-२ नं मात केली.

शारापोव्हा ऑस्ट्रेलिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये...

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 09:35

रशियन ग्लॅमरगर्ले मारिया शारापोव्हानं ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल गाठलीय. यासोबतच तिनं एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद केलीय.

मॅथ्यू हेडनचा क्रिकेटला राम-राम

Last Updated: Friday, September 21, 2012, 10:11

ऑस्ट्रेलियाचा धुवाँधार सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन यानं गुरुवारी संपूर्ण क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. तसंच तो ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी२०मध्येही सहभागी होणार नाही. तो ब्रिस्बेन हिट संघाकडून टी२० खेळत होता.

राफेल नदाल रफादफा.. ज्योकोविच विजेता

Last Updated: Sunday, January 29, 2012, 23:41

वर्ल्ड नंबर वन नोवाक ज्योकोविचनं राफेल नदालचा पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत आजच्या चित्तथरारक सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे.

पेसने दुहेरीत मारली बाजी...

Last Updated: Sunday, January 29, 2012, 12:07

भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा जोडीदार रॅडिक स्टेपनिकने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये डबल्सच विजेतेपद पटकावलं आहे. पेस-स्टेपनिकने अव्वल सीडेड अमेरिकेच्या ब्रायन बंधूंना ७-६, ६-२ ने पराभूत केलं.

'ऑस्ट्रेलियन ओपन'मध्ये सानिया मिर्झा पराभूत

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 19:50

भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि रशियन खेळाडू एलेना वेस्नीना ही जोडी वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्या आहेत.