नाशिकमध्ये २०६० भूतबंगले

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:28

नाशिकमध्ये तब्बल २०६० घरं गरीबांसाठी बांधून तयार आहेत. पण कुणाचंच लक्ष या घरांकडे नाही. त्यामुळे या घरांचे अक्षरशः भूतबंगले झाले आहेत.

मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... तोही हाऊसफुल्ल

Last Updated: Sunday, February 2, 2014, 22:45

मुंबईकरांच्या सेवेत नव्याने रूजू झालेली मोनो रेल पाहण्यासाठी आज पहिल्याच दिवशी तोबा गर्दी उसळली... भारतातील पहिल्याच मोनो रेल सफरीचा आनंद लुटण्यासाठी पहाटेपासूनच मुंबईकर रांग लावून उभे होते. परिणामी मोनो रेलचे व्यवस्थापन पुरते कोलमडले आणि त्याचा फटका उत्साही प्रवाशांना बसला. मात्र, मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... हाऊसफुल्ल झाला.

...त्यांनी आपलं बाळ बॅगेत भरून टाकलं रेल्वेत

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 10:17

मुंबईच्या लोकलमध्ये एक बेवारस पडलेली बॅग एका नेलपॉलिश विक्रेत्यानं एक बॅग पळवली. पण बॅग उघडल्यावर मात्र त्याची बोबडीच वळली आणि त्यानं पळ काढला... का काढला त्यानं पळ? असं काय होतं त्या बॅगेत.... एखाद्या सिनेमात शोभेल असा हा प्रकार प्रत्यक्षात घडलाय... आणि अखेर एका निरागस जिवाला जीवदान मिळालं..

मोनोरेलचे सारथ्य करणार मराठी तरूण

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 08:54

भारतातील पहिली मोनो रेल ही वडाळा -चेंबूर मार्गावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या मोनोरेलचे सारथ्य करण्यासाठी ४३ जणांची टीम सज्ज झाली आहे. यात बहुतांश मराठी तरूण आहेत.

मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 09:45

मुंबई कधी धावणार मोनो, असा प्रश्न आता विचारला जाणार नाही. कारण ही मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मोनरेलचे आवश्यक असणारे एमएमआरडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे मोनोरेल धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मोनोचा पहिला प्रवास हा चेंबूर-वडाळा असणार आहे.

एल अँड टीच्या इमर्जन्सी एव्हिटेशन प्लांटला आग

Last Updated: Thursday, November 21, 2013, 13:59

मुंबईत आज अग्नीतांडव पाहायला मिळाला. एकीकडे बॅक बे आगार परिसरातल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. तर त्यापूर्वी वडाळ्यात ट्रक टर्मिनसमधल्या लोढा बिल्डिंगच्या शेजारी न्यू कफ परेड कंपाऊंडमध्ये एल अँड टीच्या इमर्जन्सी एव्हिटेशन प्लांटला आग लागली होती.

दोघा अभागी जीवांच्या प्रेम कहाणीचा असा दुःखांत!

Last Updated: Saturday, November 16, 2013, 10:45

लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात... परंतु काहींच्या नशिबात तेही नसतं... म्हणूनच की काय, ती गाठ बांधून घेण्यासाठी त्यांना पुन्हा स्वर्गाचीच वाट धरावी लागते. पल्लवी पूरकायस्थ आणि अविक सेनगुप्ता या अभागी जीवांची ही करूण प्रेमकहाणी.

मोनोसाठी मुंबईकरांची प्रतीक्षा आणखी लांबणीवर!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 14:20

मुंबईकरांचे डोळे लागलेल्या ‘मोनोरेल’च्या उद्घाटन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलंय. आता मोनोरेलच्या उद्घाटनासाठी १५ सप्टेंबरचा मुहूर्त मिळालाय

वडाळ्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण?

Last Updated: Thursday, July 11, 2013, 17:57

वडाळ्यात दरड कोसळून दोन जणांचे बळी गेले. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती. मुख्यमंत्र्यांनी इथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश देऊनही, ते गांभीर्यानं घेण्यात आले नाहीत.

वडाळ्यात दरड कोसळली; दोघे ठार, चार जखमी

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 11:59

वडाळ्याला अॅन्टॉप हील परिसरात दरड कोसळण्याची घटना घडलीय. जुन्या पोस्ट ऑफीसच्या बाजूला देवरामदादा चाळीवर ही दरड कोसळल्याची माहिती आहे.

जॉनने संजय गुप्ताला दिली २४ लाखांची बाईक

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 16:15

शुक्रवारी रिलीज झालेल्या शूटआऊट ऍट वडाळा या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे सिनेमाचा अभिनेता जॉन आब्रहम याने खुश होऊन सिनेमाचा दिग्दर्शक संजय गुप्ता याला २४ लाख रुपये किमतीची बाइक भेट म्हणून दिली आहे.

रिव्ह्यू : शूटआऊट अॅट वडाळा

Last Updated: Friday, May 3, 2013, 20:00

कसा आहे आज रिलीज झालेला `शूटआऊट अॅट वडाळा` सिनेमा?

सनी लिऑनचा Bold आणि Sexy अवतार

Last Updated: Friday, April 12, 2013, 18:25

कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑन ही ‘शुटआऊट ऍट वडाळा’मध्ये आग लावण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटातील आयटम साँग ‘लैला तेरी ले लेगी’ हे गाणे छोट्या पडद्यावर प्रोमोच्या माध्यमातून झळकल्यानंतर आता चित्रपटातील तिचे काही हॉट लूक असलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. ते खूपच बोल्ड आहे

सनी लिऑनच्या `लैला`चा इंटरनेटवर धुमाकूळ

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 17:18

कॅनडियन पॉर्न स्टार सनी लिऑनचं देशी ठुमक्यांचं ‘लैला तेरी ले लेगी…’ हे गाणं टीव्हीवर दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र इंटरनेटवर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे.

`लैला तेरी ले लेगी` गाण्यात सनी लिऑनचा देशी तडका

Last Updated: Thursday, April 4, 2013, 15:58

सनी लिऑन आगामी शूटआऊट अॅट वडाला या सिनेमात आयटम साँगवर थिरकणार आहे.

प्रियांका चोप्रा बनली `बदमाश बबली`!

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 20:29

संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूटआऊट ऍट वडाळा’ सिनेमामध्ये आयटम साँगमध्ये प्रियांका चोप्रा ठुमके लगावताना दिसणार आहे. मात्र, आयटम साँगसाठी आपला होकर कळवण्यापूर्वी प्रियांकाने या आयटम साँगमध्ये काही अश्लीलता नाही ना, हे तपासून पाहिलं.

मोनोरेल... पावसाळ्यात येणार धावून

Last Updated: Friday, February 15, 2013, 09:37

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांचे मोनो रेल्वेतून प्रवास करण्याचं स्वप्न साकार होणार आहे.

वाहतुकीचा खेळखंडोबा

Last Updated: Friday, July 20, 2012, 21:46

पोलीस खबऱ्याचा मारेकरी जग्या नेपाळी गजाआड

Last Updated: Saturday, June 16, 2012, 09:02

मुंबईतल्या वडाळा भागातील पोलीस खबऱ्याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा झालाय. पोलीस-खबरी नासीर शेख उर्फ नासीर दाढीची हत्या करणारा कुख्यात गुंड जग्या नेपाळीला मुंबई क्राइम ब्रान्चनं अटक केलीय.

संजय गुप्ताला 'हटके' प्रमोशन पडलं महागात

Last Updated: Thursday, March 1, 2012, 12:52

भलती कल्पकता ‘शूट आऊट अॅट वडाळा’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या अंगाशी आली आहे. निमंत्रण पत्रिकेत पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर केल्यानं संजय गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुंबईत मोनोरेल चाचणी यशस्वी !

Last Updated: Saturday, February 18, 2012, 13:13

मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या मोनोरेलची चाचणी यशस्वी झाली आहे. वडाळा डेपो ते वडाळा आयमॅक्स मार्गावर चाचणी घेण्यात आली. सुमारे दोन किलोमीटरपेक्षा जास्त मार्गावर मोनोरेलची चाचणी घेण्यात आली.यावेळी रेल्वेचे वरीष्ठ तंत्रज्ञ उपस्थित होते.