अल्पवयीन मुलीवर पत्नीच्या मदतीने बलात्कार! Man rapes a minor girl with his wife`s help

अल्पवयीन मुलीवर पत्नीच्या मदतीने बलात्कार!

अल्पवयीन मुलीवर पत्नीच्या मदतीने बलात्कार!
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

औरंगाबाद येथे २१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली हे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी त्याच्या पत्नीनेच त्याला मदत केली. रोहित जाधव असं या आरोपीचं नाव असून त्याला सध्या शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपीची पत्नी फरार हे.

पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. २००७ पासून रोहित या पीडित मुलीचा पाठलाग करत असे. पीडित अल्पवयीन मुलगी हडको एन-११ या शाळेत शिकते. तसंच तिला शारीरिक संबंधांसाठी आग्रह करत असे. तीन वेळा बाईकवरून रोहित या पीडित मुलीला म्हैसमाळ तसंच लोहगाव नांद्रा येथे घेऊन गेला होता. याशिवाय तिला बदनामीची भीती दाखवून शरीरिक संबंधांसाठी जबरदस्ती करत होता. दोन महिन्यांपूर्वी रोहितचं लग्न झालं. त्यानंतर परिस्थिती बदलेल असा अंदाज होता. मात्र एक दिवस रोहितच्या पत्नीने पीडित मुलीला घरी बोलावलं. मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत तिच्याकडे गेली. आरोपी रोहितच्या पत्नीने तिला गुंगीचं औषध मिसळलेला चहा पाजला. मुलीला चक्कर येऊ लागल्यावर तिला बेडरूममध्ये झोपवले. तेथेच आरोपी रोहितने पीडित मुलीवर बलात्कार केला.

गुंगी उतरल्यावर पीडितेच्या घडलेला प्रकार लक्षात आला. तिने याबद्दल घरच्यांना माहिती दिली आणि पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी रोहितला अटक केली असून फरार पत्नीचा शोध सुरू आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 16, 2013, 18:35


comments powered by Disqus