दिलासा देण्याच्या नावाखाली बलात्कार पीडितेवर पुन्हा बलात्कार! Woman raped twice

दिलासा देण्याच्या नावाखाली बलात्कार पीडितेवर पुन्हा बलात्कार!

दिलासा देण्याच्या नावाखाली बलात्कार पीडितेवर पुन्हा बलात्कार!
ww.24taas.com, झी मीडिया, गुडगाव

गुडगाव येथे एका महिलेवर एकाच रात्री दोन वेळा बलात्कार झाले. लोन मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्याच गावातील एका रिक्षा चालकाने तिच्यावर बलात्कार केला. याहून भीषण गोष्ट म्हणजे या घटनेनंतर तिला धीर देण्याच्या नावाखाली एका आयआरबीच्या सैनिकाने तिला आपल्या क्वार्टरमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

बादशाहपूर पोलीस स्टेशनमध्ये या महिलेने बलात्कारांसंबंधी तक्रार नोंदवली आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आलं आहे. २८ वर्षीय महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिच्याच गावातील रिक्षावाला महेंदर ऊर्फ मुन्नू तिला कर्ज मिळवून देणार होता. यासंदर्भात गुरूवारी रात्री मुन्नू महिलेला रिक्षेतून संबंधित व्यक्तीला बेटण्यासाठी घेऊन गेला. मात्र त्याची नियत बिघडली होती. त्याने बादशाहपूरला तिला नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर तेथेच रडत असलेल्या बलात्कार पीडितेची चौकशी करण्यासाठी आयआरबीचा एक सैनिक तेथे आला. महिलेला आधार देण्यासाठी आणि तिची चौकशी करण्यासाठी सैनिक तिला आपल्या क्वार्टरमध्ये घेऊन गेला. मात्र त्यानेही क्वार्टरमध्ये गेल्यावर तिच्यावर बलात्कार केला. महिलेची वैद्यकीय तपासणी झाल्यावर आता पोलिसांनी रिक्षावाला मुन्नू याला अटक केलं. मात्र सैनिक फरार झाला आहे. या सैनिकाचं नाव बालकिशन असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 6, 2013, 17:35


comments powered by Disqus