`ही तर परंपरा` : बापाकडून पाच मुलींवर बलात्कार, five girls raped by father in rajsthan

`ही तर परंपरा` : बापाकडून पाच मुलींवर बलात्कार

`ही तर परंपरा` : बापाकडून पाच मुलींवर बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, भरतपूर

राजस्थानात नात्यांना काळीमा फासणारी घटना घडलीय. एका बापानं आपल्याच पाच मुलींवर बलात्कार केला आणि जेव्हा मुलींनी आईला याबद्दल सांगितलं तेव्हा तिनं ‘ही तर आपली परंपरा आहे’ असं उत्तर दिलं.

पोलिसांनी या नराधम बापाला आणि त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. हे कुटुंब भरतपूर इथं राहणारं आहे. पीडित मुलींचा नराधम बाप निवृत्त सरकारी अधिकारी आहे. पाच मुलींपैकी सर्वात छोट्या मुलीनं आपल्या बापाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आपल्यानंतर आपला बाप आपल्या मुलीवर म्हणजेच त्याच्या नातीवरदेखील बलात्कार करतोय, हे पाहून या धाकट्या मुलीनं बापाची तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि या घटनेला वाचा फोडली.

पीडित पाचही मुली सध्या विवाहीत आहेत. नराधम बापानं आपलं लग्न वडिलांनी लग्नापूर्वी तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. मात्र, भीतीपोटी त्यावेळी तक्रार दाखल करता आली नाही असं या पीडित मुलींनी म्हटलंय. तिच्यानंतर तिच्या दोन मोठ्या बहिणींनीदेखील भरतपूरचे पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन आपल्यावरच्या अत्याचाराची माहिती दिली.

लहानपणापासून या मुलींवर लैंगिक अत्याचार सुरु होते. यामुळे दोन मुली गर्भवतीदेखील झाल्या होत्या. त्यामुळे लग्नाआधी त्यांना गर्भपातालादेखील सामोरं जावं लागलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका मुलीचा गर्भपात तिच्या लग्नाच्या १५ दिवसांपूर्वीच करण्यात आला होता. पीडित मुलींच्या आईलाही आपल्या पतीची ही कृत्यं माहित होती. मात्र, ‘ही घराची परंपरा आहे. मोठ्या बहिणींसोबत जे झाले तेच तुझ्यासोबत होतंय’ असं उत्तर आईने दिलं. यामुळे आईविरोधातदेखील मुलींनी तक्रार नोंदवली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 17, 2013, 12:56


comments powered by Disqus