बाप-लेकांनी केला मुलीवर सामूहिक बलात्कार Father and son rapes minor girl

बाप-लेकांनी केला मुलीवर सामूहिक बलात्कार

बाप-लेकांनी केला मुलीवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे रात्री शेतात गेलेल्या एका तरुणीचं दोन जणांनी अपहरण केलं. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करणारे दोघेही नराधम बाप-लेक आहेत.

सकाळी या आरोपींच्या घराजवळच तरुणी झुडुपांजवळ विवस्त्र अवस्थेत पडलेली आढळून आली. शनिवारी सकाळी तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. ती १४ वर्षीय तरुणी रात्री ११ च्या सुमारास शेतामध्ये शौचास गेली असता तिला दोन जणांनी उचलून नेलं. हे दोघेही बाप-लेक होते. तिला आपल्या घरी नेऊन दोघांनी रात्रभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

विश्राम आणि त्याचा मुलगा विजय किशोरी यांनीच त्या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसांमध्ये केली. पोलिसांनी आरोपींपैकी एकाला अटक केली आहे. मुलीला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 7, 2013, 19:02


comments powered by Disqus