आपल्या पत्नीचीही ब्ल्यू फिल्म बनवणारा नराधम अटकेत Man who shot wife`s blue film arrested

आपल्या पत्नीचीही ब्ल्यू फिल्म बनवणारा नराधम अटकेत

आपल्या पत्नीचीही ब्ल्यू फिल्म बनवणारा नराधम अटकेत
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

ब्लू फिल्म तयार करून विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश नागपुरात झाला असून आणि या प्रकरणात धर्मेंद्र जैन नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे जैन नावाच्या या आरोपी नराधामाने आपल्या पत्नीची देखील अश्लील ब्लू फिल्म काढली. या संबंधीची तक्रार खुद्द त्याच्या पत्नीने पोलिसांकडे केली आहे. आपल्या शिवाय आपल्या पतीने आजवर अनेक मुलींची ब्लू फिल्म काढली असून ती फिल्म तो विकत असल्याचा आरोप धर्मेंद्रच्या पिडीत पत्नीने केला आहे. पोलिस या प्रकरणात आता इतर पिडीत मुलींची आणि महिलांची माहिती काढीत आहे. ब्लू फिल्म तयार करून विकणारे हे अंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा आरोप देखील या प्रकरणात होत आहे.

नागपूरच्या जयताळा भागातील बंगल्यात मुलींचे आणि महिलांचे अश्लील व्हिडीओ काढले जायचे. गेल्या २ वर्षा पासून हा गैर प्रकार सतत सुरु होता. या प्रकरणाचा सूत्रधार होता धर्मेंद्र जैन नावाचा उद्योगपती. गीता इंजीनिरिंग कॉर्पोरेशन नावाच्या कंपनी धर्मेंद्र जैनने उघडली होती. पण याचा खरा व्यवसाय होता ब्लू फिल्म काढण्याचा. आजवर त्याने अनेक महिलांचे आणि मुलींचे अश्लील चित्रीकरण केले. पण धर्मेंद्र जैनने सर्व मर्यादा तेव्हा ओलांडल्या, जेव्हा त्याने आपल्याच पत्नीचा अश्लील व्हिडीओ तयार केला. तयार केलेले अश्लील व्हिडीओ ५०,००० रुपयाला विकत असल्याच आरोप त्याच्या पत्नीने लावला आहे.

धर्मेंद्र जैन आपल्या पत्नीला मारहाण करीत असे. त्याने आपला खून करायचा देखील प्रयत्ने केल्याचा आरोप त्याची पत्नी निधी जैनने लावला आहे. सुरवातीला पोलिसांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून तिला वरिष्ठ पोलिसांकडे दाद मागावी लागली. पोलिसांनी या नंतर कारवाई करत धर्मेंद्र जैनला अटक केली आणि त्याच्या कॉम्पुटर सहित इतर साहित्य जप्त केले. पोलिस जप्त केलेले साहित्य तपासत असून त्यातून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय यात इतर कुणी सहभागी आहे का याचा तपासही करीत आहेत.

दरम्यान अटक झाल्यावर प्रकृती बिघडल्याचे कारण सांगत धर्मेंद्र जैन रुग्णालयात भरती झाला. पोलिस तपासात या प्रकरणाचे महत्वाचे धागे दोरे गवसण्याची शक्यता असल्याने आता या पुढे काय निष्पन्न होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 1, 2013, 21:43


comments powered by Disqus