युक्ती मुखीने केली पती विरोधात अनैसर्गिक सेक्सची तक्रार, Yukta Mookhey Lodges Dowry Harassment and Physical Abuse

युक्ती मुखीने केली पती विरोधात अनैसर्गिक सेक्सची तक्रार

युक्ती मुखीने केली पती विरोधात अनैसर्गिक सेक्सची तक्रार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवुड अभिनेत्री युक्ती मुखी हीने आपला पती प्रिन्स तुली यांच्या विरोधात आंबोली पोलिस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुखीने आपल्या तक्रारीत पती तिला नेहमी मारहाण आणि शिव्या देत होता असे म्हटले आहे.

आंबोली पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीसीच्या कलम ४९८ अ (क्रुरता आणि प्रतारणा) आणि ३७७ (अनैसर्गिक सेक्स) अंतर्गत तक्रार दाखल आहे. मूळचे भारतीय असलेल्या तुली याचा न्यू यॉर्कमध्ये व्यापार आहे. तो फायनानशिएल कन्सल्टंट म्हणून काम करतो. तक्रारीनंतर युक्ता मुखीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. यापूर्वी युक्ता मुखी पतीविरोधात अनेकवेळा तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारी अदखलपात्र गुन्हा म्हणून दाखल करण्यात आल्या आहेत. अदखलपात्र म्हणजे कोर्टाच्या आदेशाशिवाय पोलीस कोणत्याही प्रकारची एफआयआर दाखल करता येणार नाही. तसेच अटक आणि चौकशीही करता येत नाही.

युक्ताचे लग्न २ नोव्हेंबर २००८ रोजी झाले होते, तिला एक मुलगाही आहे. युक्ता मुखी डिसेंबर १९९९ मध्ये मिस वर्ल्ड बनली होती. तिला लंडनच्या ओलम्पिया थिएटरमध्ये मिस वर्ल्डचा मुकूट परिधान करण्यात आला होता. त्यावेळी मुखी २० वर्षांची होती. तीने अनेक बॉलिवुड चित्रपटातही काम केले आहे. चित्रपट करिअरमध्ये फारसे काही झाले नाही म्हणून तिने लग्न केले. तुलीचे कुटुंब मध्य भारतात हॉटेल, मॉल, लॉजिस्टिक्स, शिक्षण आणि निर्माण क्षेत्रात व्यवसाय करतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 8, 2013, 17:12


comments powered by Disqus