Last Updated: Wednesday, July 10, 2013, 12:06
www.24taas.com, झी मीडिया, अमरावती गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील एका सहाय्यक प्राध्यापिकेच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून त्यावर अश्लील छायाचित्र आणि क्लिपिंग अपलोड केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राध्यपिकेच्या नावाचा गैर वापर करत अकाऊंट ओपन करण्यात आल्यानंतर त्यावर २१ जून रोजी छायाचित्र आणि क्लिपिंग अपलोड करण्यात आल्यात. एवढ्यावरच न थांबता त्यांचा मोबाईल क्रमांकही टाकण्यात आला होता. त्यामुळे त्यांना काही लोकांकडून कॉल्सही आलेत. त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
या प्राध्यपिकेला फोन येऊ लागल्याने आपला मोबाईल नंबर कसा मिळाला, अशी त्यांनी विचारणाही केली. त्यावेळी तुमचा नंबर फेसबुकवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता फेसबुकवर आपल्या नावाने बनावट प्रोफाईल केल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय.
#
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.#
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 10, 2013, 12:02