भयानक : ४ अल्पवयीन मुलींवर २५ जण तुटून पडले!, Four minor girls gangraped by mob of 20

भयानक : ४ अल्पवयीन मुलींवर २५ जण तुटून पडले!

भयानक : ४ अल्पवयीन मुलींवर २५ जण तुटून पडले!
www.24taas.com, झी मीडिया, रांची

झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील लिट्टीपाडा या भागात जवळजवळ २५ जणांनी चार आदिवसी मुलींवर सामूहिक बलात्कार केलाय. यातील दोन पीडित मुलींची प्रकृती गंभीर आहे. शाळेच्या वसतीगृहात घुसून या टोळक्यानं हे घृणास्पद कृत्य केलंय.

लिट्टीपाडा भागातील लबदा गावात ही घटना घडली. गावातील ईसीआय मिशन शाळेच्याल मुलींच्या वसतीगृहात रविवारी रात्री उशीरा जवळपास २५ जण घुसले. प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शिक्षक ई. बी. मालतो यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की `ठार मारण्याची धमकी देऊन त्यांनी माझा मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर सर्व शिक्षकांना एका खोलीत बंद केले होते`. पहाडी जमातीच्या चार मुलींना ते जवळच्याच जंगलात घेऊन गेले. तिथे या मुलींवर दोन तासांपर्यंत सर्वांकडून बलात्कार करण्यात आला. यावेळी या आरोपींपैंकी दोघे जण दोन तासांपर्यंत शाळेच्या बाहेर पहारा देत उभे होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या सर्वांचे चेहरे रुमालानं झाकलेले होते.

बलात्कार पीडित दोन तरुणींची प्रकृती गंभीर आहे. हे आरोपी कोण होते? हे कृत्य करण्यामागं त्यांचा काय हेतू होता याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेही मारले पण अद्याप त्यांना या आरोपींचा शोध लागलेला नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 16, 2013, 09:43


comments powered by Disqus