औरंगाबाद अपघातात सात ठार

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 11:46

औरंगाबाद पैठण रोडवर ढाकेफळ फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झालेत. वाळूच्या भऱधाव ट्रकने अँपेरिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर रिक्षाच्या चालकासह आणखी एकाचा मृत्यू झाला.

दहशतवादी अबू जिंदालचं कुटुंब पळून गेलं...

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 18:07

मुंबईतल्या २६/११ हल्ल्यातला प्रमुख संशयित अबू जिंदालचे कुटुंबीय घर सोडून पसार झाले आहेत. अबू बीड जिल्ह्यातल्या गेवराईचा रहिवासी असून तिथं त्याचे कुटुंबीय राहत होते.

दरोडेखोरांचा पोलिसांवर कुऱ्हाडी-कोयत्यानं हल्ला

Last Updated: Saturday, June 23, 2012, 13:29

हिंगोलीत पोलीस निरीक्षकाच्या गाडीवर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड गंभीर जखमी झालेत.

मद्यधुंद तरूणाने पाच जणांना उडविले

Last Updated: Thursday, June 21, 2012, 10:28

औरंगाबादमध्ये दारु पिऊन गाडी चालवणा-या युवकानं पाच नागरिकांनी जखमी केलंय. संतप्त नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या युवकाची चांगलीच पिटाई केली.

वनमंत्र्यांच्या मुलाचं वनप्रेम वादात

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 13:46

औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात राज्याच्या वनमंत्र्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी अभयारण्याचे नियम मोडीत काढत मेळावा साजरा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे वनकर्मचा-यांदेखत हे सर्व घडलं... एव्हढंच नाही तर वनकर्मचाऱ्यांनीदेखील कदम यांच्या या ‘सत्कार्याला’ हातभार लावला.

अपघाती पुल, ढिम्म प्रशासन

Last Updated: Monday, June 18, 2012, 23:28

खाजगी प्रवासी बस पुलावरून दरीत कोसळल्यामुळं नळदुर्गजवळ झालेल्या भीषण अपघातात २९ जणांचा मृत्यू झाला होता. या अरुंद पुलावर याअगोदर अनेकदा अपघात होऊनही प्रशासनाला जाग आलेली नाही.

वन मंत्र्यांच्याच मुलाने तोडला वन कायदा!

Last Updated: Monday, June 18, 2012, 14:47

गौताळा अभयारण्याचे सगळे निकष धाब्यावर बसवत रविवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा युवा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला...

फरार डॉ. मुंडेचे पाच राज्यांत वास्तव्य

Last Updated: Monday, June 18, 2012, 09:53

परळीतील बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणी फरार झालेला डॉ. सुदाम मुंडे अखेर पोलिसांना शरण आलाय. मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांनी परळीतल्या पोलीस स्टेशनसमोर हजेरी लावली. पोलिसांना चकवा देत मुंडे पती-पत्नीने २६ दिवसांत तब्बल पाच राज्य पालथी घातली.

डॉ. सुदाम मुंडेची 'सपत्नीक' शरणागती

Last Updated: Sunday, June 17, 2012, 23:37

परळीतल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकऱणी डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे रात्री 9 वाजता परळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. उद्या सकाळी त्यांना परळी न्यायालयात हजर करणार आहेत. मुंडे काल संध्याकाळपर्यंत परळीमध्येच होता.

केज निवडणूक: संगीताची सांगता, 'पृथ्वी'चे राज

Last Updated: Saturday, June 16, 2012, 12:47

बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्यात सरळ लढत असल्याचं दिसून येतंय. १२ व्या फेरीअखेर पृथ्वीराज साठे जवळजवळ ५५०० मतांनी आघाडीवर आहेत.