कल्याण-वाशी रेल्वे मार्गाने जोडणार, मार्गाला मंजुरी

Last Updated: Saturday, February 15, 2014, 08:30

कल्याण आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कल्याण-वाशी नव्या रेल्वे मार्गाने जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वेच्या पुरवणी अर्थसंकल्पात कल्याण-वाशी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती खासदार आनंद परांजपे यांनी दिलेय.

`आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा

Last Updated: Friday, February 14, 2014, 13:18

‘व्हॉटस अप’वर एक इमेज रिसीव्ह झाली. ‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ..

 शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य – अजितदादा

शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य – अजितदादा

Last Updated: Thursday, February 13, 2014, 21:40

आजच्या घडीला राज्यात शंभर टक्के टोलमुक्ती अशक्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.. काही लहान रस्ते आणि पूलांवरील टोल रद्द करण्याबाबत सकारात्मक असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. राज ठाकरेंच्या टोलविरोधी आंदोलनावर उपमुख्यमंत्र्यांनी टीका केली..

अंबरनाथच्या निशांतला गरज मदतीच्या `हातांची`

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 19:58

विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग काढताना आठवीतल्या निशांतला विजेचा मोठा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याने आपले दोन्ही हात गमावले. मात्र, निशांत खचला नाही.

मुंबई-गोवा मार्गावरील अपघातात ३५ जण जखमी,१६ गंभीर

मुंबई-गोवा मार्गावरील अपघातात ३५ जण जखमी,१६ गंभीर

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 10:17

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झालेल्या धडकेत ३५ जण जखमी झालेत. त्यामधील १६ जण गंभीर आहेत. सकाळी पावणे पाचला हा अपघात झालाय.

नारायण राणे नाराज, काँग्रेसमध्ये माझा `सेवादल`

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 08:42

काँग्रेसमध्ये आपणाला डावलले जात असल्याची खंत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखवलीय. ठाण्यामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस माझाही सेवादल करण्याच्या बेतात आहे... पण तरीही मी गप्प बसणार नाही. माझ्यावर राख साचू देणार नाही. निखारा हा निखाराच राहिला पाहिजे, असे राणेंनी यावेळी स्पष्ट केलं.

खासगी कामाला अग्निशमन दलाची गाडी

खासगी कामाला अग्निशमन दलाची गाडी

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 07:42

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अग्निशमन सेवा चक्क खाजगी शाळेच्या संस्थेच्या कार्यक्रमात मैदान धुण्यासाठी वापरली जात असल्याचं झी मीडियानं उघडकीस आणलंय.

कोकण रेल्वे मार्गावर डबल-डेकर गाडी धावणार

कोकण रेल्वे मार्गावर डबल-डेकर गाडी धावणार

Last Updated: Saturday, February 8, 2014, 23:06

कोकणवासियांसाठी खूषखबर. लवकरच डबल-डेकर ट्रेन धावणार आहे. आगामी अर्थसंकल्पात या रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता कोकणातल्या चाकरमान्यांसाठी खुषखबर आहे. कोकणातल्या रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता लवकरच डबल डेकर रेल्वे सुरू केली जाणार आहे. लवकरच डबल-डेकर ट्रेन धावणार आहे. आगामी अर्थसंकल्पात या रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. आहे.

टेंपो दरीत कोसळून अपघात, ९ गंभीर

टेंपो दरीत कोसळून अपघात, ९ गंभीर

Last Updated: Saturday, February 8, 2014, 10:59

खेड-दापोली रस्त्यावर कुवे घाटात टेंपो दरीत कोसळलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेंपो दरीत कोसळला. टेंपोमध्ये १४ कंत्राटी कामगार प्रवास करत होते. चौदापैकी ९ कामगार गंभीर जखमी आहेत. जखमींवर दापोलीतल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरुयात.

CM साठी आठ वर्षे प्रलंबित रस्ता एका रात्रीत चकाचक

CM साठी आठ वर्षे प्रलंबित रस्ता एका रात्रीत चकाचक

Last Updated: Friday, February 7, 2014, 16:03

एरव्ही रस्ते कोणी दुरुस्त करायचे यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सर्वजनिक बांधकाम विभागामध्ये शाब्दीक चकमक होत असते. पण दापोलीत कृषी विभागाच्या कार्यक्रमाला राज्यपाल के शंकर नारायणन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय आले आणि जिल्हा परिषदेचा रस्ता सार्वजनिक विभागानं एकदम डांबर टाकून चकाचक केला.