ठाण्यात मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

Last Updated: Thursday, December 19, 2013, 14:00

ठाणे महानगरपालिकेबाहेर मनसेनं आज आंदोलन सुरु केलंय. ‘विक्रांत’ला पैसे देऊ नका ठाण्यातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी भूमिका मनसेनं घेतलीये.

ठाण्यात शिवसेना - काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

Last Updated: Thursday, December 19, 2013, 07:44

ठाणे महानगरपालिकेच्या परीवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. परीवहन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आघाडीनं फोडलेल्या शिवसेनेच्या सदस्याचा अर्ज भरताना हा प्रकार घडलाय.

ठाण्यात चिमुरड्यावर केले शिपायाने अत्याचार

ठाण्यात चिमुरड्यावर केले शिपायाने अत्याचार

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 19:55

सीनिअर केजीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेच्या शिपायानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील एका इंग्रजी शाळेत उघडकीस आली आहे. या शिपायाला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.

ठाण्यात धक्कादायक प्रकार, शिपायानेच केलं विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य

ठाण्यात धक्कादायक प्रकार, शिपायानेच केलं विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 09:51

एका सीनियर केजीमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यावर शाळेच्या शिपायानंच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या नामवंत सरस्वती विद्यालय या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घडलाय.

धक्कादायक: ओव्हर टेक करु दिलं नाही म्हणून डॉक्टरची हत्या

Last Updated: Sunday, December 15, 2013, 21:46

आजपर्यंत अनेक लहान मोठ्या कारणांवरुन हत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या पाहिल्या असतील पण ओव्हर टेक सारख्या शुल्लक कारणावरुन एखाद्याची हत्या कुणी करेल का? होय ओव्हर टेक करु दिला नाही म्हणून कल्याणमध्ये एका डॉक्टराची हत्या करण्यात आलीय.

दलित तरुणीसोबत प्रेमविवाहापूर्वीच तरुणाची क्रूर हत्या

दलित तरुणीसोबत प्रेमविवाहापूर्वीच तरुणाची क्रूर हत्या

Last Updated: Saturday, December 14, 2013, 16:33

प्रेमविवाह करण्याआधीच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शहापूर-चेरपाली इथं घडलीय. तो एका दलित मुलीशी प्रेमविवाह करू इच्छित होता.

ऊर्जेसाठी जैतापूर प्रकल्प गरजेचा - शरद पवार

ऊर्जेसाठी जैतापूर प्रकल्प गरजेचा - शरद पवार

Last Updated: Saturday, December 14, 2013, 15:18

कोकणात पर्यावरणपूरक उद्योगांची आवश्यकता आहे. अशा उद्योगांना ऊर्जा मिळण्यासाठी जैतापूरसारखे अणू ऊर्जा प्रकल्पच उपयोगी असतील, असं पवार म्हणालेत. कोकणात पर्यटन विकासासाठी महामार्ग तसंच जलमार्ग विकास होणे आवश्यक आहे असं पवार म्हणाले.

वसईत महिलेचा नरबळी, मांत्रिकासह सहा जणांना अटक

वसईत महिलेचा नरबळी, मांत्रिकासह सहा जणांना अटक

Last Updated: Saturday, December 14, 2013, 20:12

ठाणे जिल्ह्यात धक्कादायक बाब उघड झाली आहे. जिल्ह्यातील वसई येथे चक्क महिला नरबळी देण्यात आले आहे. या अघोरी प्रकारामुळे चीड व्यक्त होत आहे. महिला बळी देणाऱ्या मांत्रिकासह सहा जणांना पोलिसांनी अटक केले आहे.

जातपंचायतीचं भूत, मुरूडमध्ये चक्क चौदा कुटुंबांवर बहिष्कार

जातपंचायतीचं भूत, मुरूडमध्ये चक्क चौदा कुटुंबांवर बहिष्कार

Last Updated: Saturday, December 14, 2013, 11:12

जातपंचायतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिल्यानंतर राज्यभरात एका मागून एक धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. रायगड जिल्ह्यात तर जात पंचायतीच्या जाचक निर्णयाने उच्छाद मांडला आहे. चक्क मुरूड सारख्या पर्यटन शहरामध्ये दोन वर्षांपासून चौदा कुटुंबांना यामुळे नरक यातना भोगाव्या लागत आहेत.

ठाण्यात अश्लील चाळे करणाऱ्या ‘बॉस’ला चोप

ठाण्यात अश्लील चाळे करणाऱ्या ‘बॉस’ला चोप

Last Updated: Friday, December 13, 2013, 17:23

ठाण्यामध्ये एका खासगी विमा कंपनीत काम करणाऱ्या दोन मुलींची छेड काढणाऱ्या त्यांच्या बॉसला मुलींनी आणि त्यांच्या नातलगांनी चांगलाच चोप दिलाय.