जैतापुरात शिवसेना करणार अनोखं आंदोलन

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 08:08

जैतापूर प्रकल्पाचा विषय गेल्या काही दिवसांपासून थंड असतानाच ऐन पावसात शिवसेनेच्या मदतीने स्थानिक ग्रामस्थांनी आज अनोखं आंदोलन जाहीर केलंय. प्रकल्पस्थळी घुसून सामुदायिक शेती आंदोलन करण्यात येणार आहे.

राज आदेशानंतर ठाण्यातही खळ्ळखट्याक

Last Updated: Thursday, June 14, 2012, 10:33

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टोलविरोधातल्या आदेशाचे पडसाद ठाण्यातही उमटले. ठाण्यात घोडबंदर नाक्यावर मनसैनिकांनी आंदोलन करत, टोलनाका बंद केला.. तर आनंदनगर टोलनाक्याच्या मॅनेजरला मनसैनिकांनी घेराव घातला होता.

तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू

Last Updated: Sunday, June 10, 2012, 22:37

रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रात तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू झालाय. हे तिघंही पिंपरी चिंचवडच्या वायआयटी कॉलेजचे प्राध्यापक असल्याचं सांगण्यात येत आहे.

पावसाने मुंबई-गोवा हायवेवर कोंडी

Last Updated: Sunday, June 10, 2012, 23:02

पावसामुळं मुंबई गोवा हायवेवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. वडखळ नाका-नागोठणे दरम्यान वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

हवाहवासा गोडवा... फणसाचा

Last Updated: Saturday, June 9, 2012, 18:19

कोकणी माणसाला फणसाची उपमा दिली जाते. कारण फणसाला वरून जरी काटे असले तरी आतला गोडवा हवाहवासा वाटतो. कोकणात फणसाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. गऱ्यांप्रमाणे कोकणात औषधी गुणधर्म असल्यानं फणसाला दिवसेंदिवस मागणी वाढू लागलीय.

दीडशे वर्षांनंतर 'भाऊ' धक्क्यालाच

Last Updated: Saturday, June 9, 2012, 18:03

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. मात्र, येथील समस्या आजही दीडशे वर्षानंतर कायम आहे. त्यामुळे भाऊच्या धक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दीडशे वर्षांनंतर जुन्याच बोटींने प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचं होमहवन, सेनेची साथ

Last Updated: Thursday, June 7, 2012, 16:17

ठाण्यातल्या राजकीय पक्षांनी अनधिकृतरित्या थाटलेली कार्यालये काढण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेला सर्वपक्षीय विरोध वाढू लागला आहे. अतिक्रमण काढण्याच्या भितीनं कोपरी भागातल्या काँग्रेसच्या कार्यालयात होमहवनचे आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचा राडा, पोलिसांवर दगडफेक

Last Updated: Thursday, June 7, 2012, 13:40

ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केली.

आला मान्सून, ठेवणार मीठ झाकून

Last Updated: Thursday, June 7, 2012, 09:09

पावसाळा अगदी तोंडावर आलाय. सर्वत्र मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. वसईतले मीठ उत्पादकही सध्या आपल्या मीठाची झाकपाक करण्यात व्यस्त आहेत. वादळाचा अंदाज घेऊन मीठ उत्पादक मीठाला झाकण्याची तयारी सुरू झाली.

... आणि मिळालं २४ तास मूबलक पाणी

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 18:48

संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं असताना बदलापूरमधल्या शिवदर्शन सोसायटीतल्या रहिवाशांना २४ तास पाणी उपलब्ध होऊ शकलं... याचं श्रेय द्यावं लागेल रेन वॉटर हार्वेस्टिंगला आणि बदलापूर नगरपालिकेला...