'विटावा सबवे'साठी परांजपे- आव्हाडांमध्ये हेवेदावे

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 22:28

ठाण्यातल्या विटावामधल्या सबवेचं गेल्या वर्षापासून काम सुरू आहे. शिवसेना खासदार आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या सबवेच्या ठिकाणी पोहोचले. आणि अचानक नारळ फोडून या मार्गाचं उद्घाटन केलं.

लाल छत्रीने ३५ मुलांचा जीव वाचवला

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:01

पनवेलमधल्या खांदा कॉलनी इथल्या रेल्वे फाटकावर मोठी दुर्घटना टळली. नवीन पनवेल इथल्या सेंट जोसेफ हायस्कूलची विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी स्कूल बस दुपारी दीडच्या सुमारास फाटक ओलांडताना बंद पडली.

ठाण्यात दुधाची भेसळ

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 15:52

मुंबई, नवी मुंबई, पुण्यापाठोपाठ आता ठाण्यातही दूध भेसळीविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आलीये. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं ठाण्यातल्या तीन टोल नाक्यांवर दूधाची वाहनं अडवून दूधाची चाचणी घेतली.

हुंड्यासाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 09:07

डोंबिवलीत उच्च शिक्षित नवविवाहितेनं हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून आत्महत्या केली. जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेस असलेल्या वृशाली गावडे या २९ वर्षीय विवाहितेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

बेहिशेबी मालमत्ता : तटकरेंविरोधात याचिका

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 10:51

सत्तेचा गैरफायदा घेऊन कुटुंबियांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप झाल्यानंतर जलसंपदा मंत्री सुनील तटकरे अडचणीत आले आहेत. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आता तटकरेंविरोधात जनहित याचिका दाखल करणयात आली आहे.

सुसरी धरणाला ग्रामस्थांचा विरोध

Last Updated: Monday, June 18, 2012, 13:22

सुसरी धरण विरोधी संघर्ष समितीने वसई-विरार शहर महानगपालिकवर मोर्चा काढला होता. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी सुसरी धरणाला विरोध असल्याचं सांगून घोषणाबाजी केलीय.

पावसाचा दणका; एक बळी, वाहतूक विस्कळीत

Last Updated: Monday, June 18, 2012, 10:48

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. देवगडमध्ये पावसाच्या पाण्यात दहा वर्षाचा मुलगा वाहून गेलाय. तर मालवणमध्ये एका घरावर माड पडून एकजण जखमी झालाय. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातही पाऊस चांगला झाला. तर पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. कल्याण बदलापूर हा हायवे ४ तास ठप्प होता. कोकण रेल्वे उशिराने धावत आहे.

कोकणात संततधार; रेल्वे चार तास उशिराने

Last Updated: Monday, June 18, 2012, 10:23

कोकण रेल्वेला जोरदार पावसाचा फटका बसला. मात्र, लांजा ते आडवली दरम्यान कोसळलेली दरड हटविण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक चार तासान उशिराने धावत आहे. कोकणमध्ये संततधार पाऊस सुरू झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढले आहे. मालवण येथे माड कोसळून एक जण जखमी झाला.

कोकण, मुंबईत पावसाला सुरूवात

Last Updated: Monday, June 18, 2012, 09:07

सिंधुदुर्गात आज पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झालीय. मान्सूनच्या आगमनानंतर लपंडाव करणा-या पावसानं आता ख-या अर्थानं हजेरी लावलीय. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवसांपूर्वीच मुंबईत पाऊस दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल, उरण भागात चांगला पाऊस झाला.

आंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटली...

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 12:40

जैतापुरात अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलनाची थिनगीनं पुन्हा एकदा पेट घेतलाय. शिवसेनेच्या मदतीनं स्थागिक ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी घुसून सामूदायिक शेती आंदोलन सुरू केलंय. हजारो प्रकल्पग्रस्त आपल्या जनावरांसह रस्त्यावर उतरलेत.