रुग्णालयाचा कारभार ढिसाळ, चोरीला गेलं तान्हं बाळ

Last Updated: Saturday, April 14, 2012, 17:06

नागपूरच्या सरकारी रुग्णालयातून चार दिवसांचं बाळ चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका अनोळखी महिलेनं विश्वास संपादन करुन हे कृत्य केल्याचं समोर येतंय. या प्रकरणानं रुग्णालयातील ढिम्म कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

नक्षलवाद्यांनी केली राष्ट्रवादी नेत्याची हत्या

Last Updated: Saturday, April 14, 2012, 16:28

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या केली. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परीषद सदस्य केवल सावकार अतकमवार यांची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

'हिवाळी अधिवेशना'मुळे दुकानदाराला मनस्ताप

Last Updated: Thursday, April 12, 2012, 08:03

हिवाळी अधिवेशनातल्या झेरॉक्सचे ११ लाखांचे बिल मिळाले नाही म्हणून, एका व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. संजय पोहरे असं या व्यावसायिकाचं नाव असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडवणुकीमुळं त्यांचं दोन वर्षांपासूनच ९ लाखांचं बिल थकलंय.

विदर्भात पाण्यासाठी वणवण

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:11

वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय.

विदर्भातील राहुल रोहणे IFS

Last Updated: Saturday, April 7, 2012, 14:52

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुऱ्यातील राहुलनं रोहणे परिवारासह राजु-याचं नाव उंच केलयं. गरीब कुटूंबातील २४ वर्षीय राहुलनं कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय IFS चा गड सर केलाय. आपल्या कर्तृत्वानं त्यानं इच्छा तिथे मार्ग ही म्हण प्रत्यक्षात साकारली आहे.

चंद्रपूरचा उड्डाणपूल प्रश्न अजून अनुत्तरितच

Last Updated: Friday, April 6, 2012, 08:18

चंद्रपूर महापालिका गठीत होऊनही शहरातील ५० हजार लोकवस्तीला भेडसावणाऱ्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न लोंबकळतोच आहे. आता महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलंय.

चंद्रपूर पालिकेत कोण मारणार बाजी??

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 17:09

ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपूर शहराच्या स्थापनेला ५०० वर्ष पूर्ण झाली आहेत. पंचशताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता महापालिका स्थापन झाली आहे. पहिल्या महापालिकेसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे.

वाशिममध्ये पुलाच्या पाईपमध्ये बिबट्या

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 07:58

अलीकडे बिबट्यानं मानवी वस्तीत प्रवेश करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या भोयनी गावातही काल सकाळच्या सुमारास एक बिबट्या पुलाच्या पाईपमध्ये आढळून आला.

विधानसभा कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 12:09

विधानसभेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या कारणावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.