चंद्रपुरात काँग्रेसला सेनेचा 'हात'

Last Updated: Monday, April 30, 2012, 12:47

चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेसच्या उमेदवारानं भाजपचा दणदणीत पराभव केलाय. काँग्रेसच्या संगीता अमृतकर यांनी भाजपच्या सुषमा नागोसे यांच्यावर २२ मतांनी मात केलीय. या निकालामुळं भाजप प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार यांना धक्का बसला आहे.

नक्षलवादी कारवाया, सर्तकतेचा इशारा

Last Updated: Monday, April 30, 2012, 12:10

देशभरात नक्षलवादी कारवायांच्या पार्श्वभूमिवर गडचिरोलीत प्रशासनानं सर्तकतेचा इशारा दिलाय. लोकप्रतिनिधी तसंच महत्त्वाच्या व्यक्तींनी दुर्गम भागात जाताना खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेत. याबाबत एक पत्रचं त्यांना पाठवण्यात आले आहे.

मनसेला साथ, भाजपला पडली महागात.....

Last Updated: Sunday, April 29, 2012, 19:27

भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात चंद्रपुरात शिवसेनेनं भाजपलाच धक्का दिला आहे. चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

'नंतर या साहेब रजेवर गेलेत'

Last Updated: Sunday, April 29, 2012, 15:50

अकोला महापालिकेचा इतिहास म्हणजे चर्चेचा विषय. मग पालिकेचा अनियमित कारभार असो, की अधिकाऱ्यांची सुटी. अकोला महापालिका कायमचं चर्चेत असते. पण याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो ही मात्र गंभीर बाब आहे.

'दक्ष SMS' मुळे पोलिसांचं आता 'लक्ष'

Last Updated: Saturday, April 28, 2012, 19:18

मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेत चंद्रपूर पोलिसांनी 'दक्ष SMS अलर्ट सिस्टीम' आणि 'SDR' या दोन सेवा सुरू केल्या आहेत. या दोन्ही सेवांचा प्रारंभ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.

वाघांची शिकार होते आहे....

Last Updated: Friday, April 27, 2012, 17:44

चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यातल्या घनदाट जंगलाचा परिसर असलेल्या पळसगाव वन परिक्षेत्रात गुरूवारी संध्याकाळी एक पट्टीदार वाघ मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, दोघांची हत्या

Last Updated: Friday, April 27, 2012, 13:05

गडचिरोली जिल्हय़ात राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचे हत्यासत्र राबवणाऱ्या नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री धानोरा तालुक्यातील मरकेगावात आणखी दोघांची हत्या केली. ते एव्हढ्यावर न थांबता दहा जणांचे अपहरण केले. यामुळे जिल्हय़ात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नागरिकांच्या अपहरणाचा पोलिसांनी दावा फेटाळला आहे.

यवतमाळमधील भूखंड घोटाळा उघड

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 19:36

यवतमाळ जिल्हयातल्या बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनानं 2 कोटी 82 लाख रूपये खर्च करून 56 एकर जमीन घेतली. मात्र त्यात मोठा गैरव्यवहार झालाय. एका आरटीआय कार्यकर्त्यानं हा घोटाळा उघडकीस आणलाय.

पेपरफुटीवर राज्यपाल नाराज

Last Updated: Monday, April 23, 2012, 19:02

नागपूर विद्यापीठातल्या बीकॉमच्या पेपरफुटी प्रकरणी विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालंय. पेपरफुटीप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाची तातडीची बैठक सुरु झालीये. या बैठकीला कुलगुरु, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता आणि चौकशी समितीचे चार सदस्य उपस्थित आहेत.

नागपुरात बिझनेस लॉचा पेपर फुटला

Last Updated: Monday, April 23, 2012, 13:41

नागपूर विद्यापीठाचा बीकॉमचा बिझनेस लॉ या विषयाचा पेपर फुटल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शनिवारी या विषयाचा पेपर होता. मात्र, त्याआधी फुटल्याने विद्य़ार्थ्यांचे श्रम वाया गेलेत.