नागपूर विमानतळावर जिवंत काडतुसं!

Last Updated: Monday, November 7, 2011, 07:10

नागपूर विमानतळावर बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याला ४३ जिवंत काडतुसाहसह अटक करण्यात आली आहे. कार्डो रिबा असं या अभियंत्याचं नाव असून तो अरुणाचल प्रदेशच्या बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे.

वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला

Last Updated: Friday, November 4, 2011, 11:28

आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा परिषदेचा वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला प्राप्त झाला. विदर्भातील कृषी विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला मोठा गौरव असल्याचं मानलं जातं.

झी 24 तास भंडारा प्रतिनिधी कांचन देशपांडे यांचं निधन

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 06:11

झी 24 तासचे भंडारा-गोंदिया प्रतिनिधी आणि पत्रकार कांचन देशपांडे यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 43 वर्षांचे होते. नागपुरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असतानाच आलेल्या ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं.

विदर्भातील शेतकरी विधवांची आदर्श भाऊबीज

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 06:28

आधार हरवलेल्या शेतकरी विधवांना सहानूभूती देण्यासाठी दिनदयाळ मंडळाने ११४ कुटुंबांना दत्तक घेत बहिणीचं नात घट्ट केलंय. यवतमाळात सामुहिक भाउबीजेचा कार्यक्रम घेऊन मंडळाने त्यांच्यातील नीरसपण घालविण्याचा प्रयत्न केलाय.

झंडु बाम झाला बदनाम!!!!

Last Updated: Saturday, October 29, 2011, 11:54

नागपूरात नामांकित ब्रँडचा बोगस झंडु बाम, चहापत्ती आणि डिटर्जंट बनवणा-या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. त्या कारखान्यातून चार राज्यात बोगस माल वितरीत केला जात होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

सरकारचा अजब निर्णय, कामगार उघड्यावर

Last Updated: Thursday, October 27, 2011, 07:33

सरकारच्या एका अजब निर्णयामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दहा हजार कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळलीय. आजारापेक्षा उपचार भयंकर असाच काहीसा प्रकार उघड झाला आहे.

मुंबईवर निरुपम यांचा उत्तर भारतीय 'राग'

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 06:34

खासदार संजय निरूपम यांनी पुन्हा उत्तर भारतियांचा सूर आवळल्याने पुन्हा वादाला तोंड फोडले आहे.

नव तंत्रज्ञानासाठी शेतकरी 'शिवारफेरी'

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:24

शेतक-यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहचण्याच्या दृष्टीने अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तीन दिवस शिवारफेरीचं आयोजन केलं. शेतक-यांच्या समस्या सोडवण्याचाहि प्रयत्नही यावेळी विद्यापिठाने केल्याने शेतक-यांनी या शिवारफेरीला चांगला प्रतीसाद दिला.

अकोला पालिकेचं दिवाळं

Last Updated: Sunday, October 23, 2011, 03:45

अकोला महानगरपालिका बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलाय. आर्थिक गैरव्यवहारांमुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.

परिस्थिला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Last Updated: Thursday, October 20, 2011, 08:13

यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावच्या कलावती बांदुरकर यांच्या विवाहित मुलीनं बिकट आर्थिक स्थितीमुळं कंटाळून आत्महत्या केलीय.