सर्वपक्षीय संमतीनेच रिपाइंचा महापौर शक्य- आठवले

Last Updated: Monday, February 27, 2012, 21:11

काँग्रेसच्या भूमिकेमुळे नाशिकमध्ये आरपीआयचा महापौर करुन सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बारगळल्याची चिन्हं दिसत आहेत. छगन भुजबळ यांनी आठवलेंना आरपीआयचा महापौर करण्याची ऑफर दिली होती. भुजबळांनी त्यासाठी सेना, भाजपची मदत मिळवून द्या, असं आठवलेंना सांगितलं होतं

बस ड्रायव्हरला मारहाण

Last Updated: Monday, February 27, 2012, 07:58

बसला कारचा धक्का लागल्यानं कारचालकासह चौघांनी बसचालक वामन अहिरेंना गाडीतून ओढून बेदम मारहाण केली. यावेळी बसमधील एकही प्रवासी अहिरे यांच्या मदतीला धावला नाही.

नाशिक महापौरपदाचा गुंता वाढला...

Last Updated: Sunday, February 26, 2012, 19:33

नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची राजकीय आकडेमोडीचा गुंता सुटता सुटत नाही आहे. मातोश्रीवर झालेल्या सेना-भाजपच्या युतीच्या बैठकीत बाळासाहेबांनी वेगळ्या बोळात घुसू नका. असा सूचक इशारा दिल्यानं मनसेची कोंडी झालीय. पुणे पॅटर्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येतय. मात्र काँग्रेसनं जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नसल्याचं सांगितलं आहे.

शाळेत शौचालय नाही तर मान्यता रद्द होणार

Last Updated: Sunday, February 26, 2012, 09:46

कोर्टाच्या निर्देशानुसार शाळांमध्ये शौचालय सक्तीचं करण्यात आलं आहे. ज्या शाळा शौचालय बांधणार नाहीत त्यांची मान्यता काढून घ्यायचा सरकारचा विचार आहे.

'नाशिकमध्ये मनसेला हादरा'

Last Updated: Saturday, February 25, 2012, 18:59

नाशिकमध्ये महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

बोगस व्होटिंग कार्ड टोळीचा पर्दाफाश

Last Updated: Friday, February 24, 2012, 17:14

नाशिकमधील बोगस व्होटिंग कार्ड बनवणा-या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतल्या एकानंच याबाबतची माहिती उघड केली.

आरोग्य विद्यापीठातील 'मुन्नाभाई'

Last Updated: Friday, February 24, 2012, 19:57

स्टाफरुममधून 9 जणांच्या उत्तरपत्रिका चोरुन पुन्हा लिहल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघड झाला आहे. नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा विभागात हा प्रकार घडलाय

नाशिकचे करोडपती नगरसेवक

Last Updated: Friday, February 24, 2012, 17:15

नाशिक महापालिकेत नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये २० पेक्षा जास्त जण बांधकाम व्यावसायिक आहेत. तर काही नगरसेविकांचे पती ठेकेदार आहेत. पन्नासहून अधिक नगरसेवक करोडपती आहेत. आता त्यांच्या हातात शहराचे भवितव्य आहे.

काँग्रेसच्या पवित्र्याने भुजबळांची कोंडी

Last Updated: Thursday, February 23, 2012, 16:31

नाशिक महापालिकेत महापौरपदासाठी रामदास आठवलेंच्या रिपाइं उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्टपणे राष्ट्रवादीला सांगण्यात आल्याचं वृत्त आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे छगन भुजबळांना मोठा हादरा बसला आहे.

मनसेचे नगरसेवक अज्ञातस्थळी

Last Updated: Thursday, February 23, 2012, 22:43

नाशिकमधील मनसेचे सर्व ४० नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. फोडाफोडीच्या राजकाणात मनसेची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे महापौरपदाची चुरस शिगेला पोहचली आहे.