नाशकात काँग्रेसची आघाडी, पराभवाचा ब्लेमगेम

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 08:07

नाशिकचा गड राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली. इतकं करुनही आघाडीची गाडी फक्त ३५ जागांपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळेच आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडत ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे.

महंताचं कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Last Updated: Thursday, February 23, 2012, 12:14

नाशिकमधील चांदवड तालुक्यात एका महंतानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ज्ञानप्रसारक द्वारकाधीश आश्रमात हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली आहे. पिडीत मुलगी अनाथ असल्यानं ती या आश्रमात शिष्य म्हणून काम करत होती.

नाशिकमध्ये आघाडीचा 'ब्लेमगेम'

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 20:29

नाशिकचा गड राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली. इतकं करुनही आघाडीची गाडी फक्त ३५ जागांपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळेच आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडत ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे.

कसा आहे राज यांचा 'नाशिकचा प्रवास'

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 16:45

राज ठाकरेंसाठी नाशिक हा मतदारसंघ बालेकिल्ला ठरण्याची चिन्ह दिसत आहे. नाशिकने यावेळी मनसेचे ४० नगरसेवक निवडून देत पुढच्या विधानसभा निवडणूकीसाठी मनसेच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा उच्चांक

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 21:57

बिहारलाही लाजवेल अशा पद्धतीनं नाशिकमधील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर इथल्या गुन्हेगारीनं उच्चांक गाठला आहे. निवडणूक काळात शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये तेहतीसहून अधिक गुन्हे झाले आहेत.

घरकुल घोटाळा : महापौरही संशयित आरोपी

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 20:24

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जळगावचे महापौर सदाशिव ढेकळेंची एक तास कसून चौकशी करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच घोटाळ्याचे तपास अधिकारी इशू सिंधू यांनी त्यांची चौकशी केली.

मनसेशी युतीला नाशिक भाजपमध्ये विरोध

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 19:46

नाशिक महापालिका निवडणुकीतील सत्ता स्थापनेवरून भाजपमध्ये मतभिन्नता दिसून येतेय. मनसेसोबत नवा नाशिक पॅटर्न राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेसह सत्ता स्थापण्यासाठी एक गट अनुकूल असला तरी शिवसेनेला डावलून मनसेसोबत सत्तास्थापन करण्यास एका गटानं विरोध केलाय.

आज घुमणार 'शिवशंभो'चा गजर

Last Updated: Monday, February 20, 2012, 14:32

आज महाशिवरात्र. मुंबईसह राज्यभर आज महाशिरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा केला जातो आहे. रात्रीपासूनच ठिकठिकाणच्या मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरातही आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

चिमुरड्यांना कोंडणारी मुजोर शाळा

Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:59

जळगाव शहरातल्या आदर्शनगरातली रुस्तुमजी स्कूल कधी शाळेतल्या शिक्षिकेचं अनोखं आंदोलन तर कधी पालकांच्या तक्रारींमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा एकदा या शाळेनं नवा प्रताप केला.

नाशिकचा महापौर हा मनसेचाच - राज

Last Updated: Sunday, February 19, 2012, 12:10

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिक मध्ये आपल्या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वपूर्ण खुलासे देखील केले. 'नाशिकचा महापौर हा मनसेचाच असणार'. असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.