'बंडखोराला भुजबळांनी रसद पुरवली'

Last Updated: Saturday, February 18, 2012, 19:11

नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीच्या पराभवामुळं पक्षात अंतर्गत वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. समीर भुजबळ यांनीच बंडखोराला रसद पुरविल्याचा आरोप त्यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.

नाशकात नवं समीकरण, मनसे-भाजप युती?

Last Updated: Saturday, February 18, 2012, 18:29

नाशिकमध्ये सत्तेसाठी नवी समीकरणे पाहायला मिळणार आहे. मनसे आणि भाजपची युतीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे महापौर मनसेचा, उपमहापौर भाजपचा होण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. मात्र, प्रत्यक्ष नेतेमंडळीनी याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे सांगून चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात भिरकावला आहे.

नाशिक महापालिका निवडणूक अपडेट्स

Last Updated: Friday, February 17, 2012, 12:16

नाशिकमध्ये शिवसेनेने -५, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने-३, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेचे हर्षा बडगुजर, सुधाकर बडगुजर, मंगला आढाव, शैलंद्र ढगे आणि मनिषा हेकरे विजयी झाले आहेत.

महापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:35

राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.

पैसेवाटपावरून मनसेचा राडा

Last Updated: Thursday, February 16, 2012, 17:32

नाशिकमधील पंचवटीच्या प्रभाग क्र. १४ मध्ये मतदानाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून मनसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

ऐश्र्वर्य पाटेकर साहित्य अकादमीने सन्मानित

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 11:45

नाशिकच्या ऐशवर्य पाटेकर यांना साहित्य अकादमीचा २०११ सालचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाटेकर यांच्या २०११ साली प्रकाशीत झालेल्या भुईशास्त्र या काव्यसंग्रहासाठी अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. ऐशवर्य पाटेकर हे निफाड तालुक्यातील काकासाहेबनगर इथे असलेल्या काकासाहेब वाघ महाविद्यालयात व्याखाता आहेत.

राज ठाकरे स्वत: गुंडगिरी करतात - भुजबळ

Last Updated: Monday, February 13, 2012, 19:19

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिकच्या सभेमध्ये छगन भुजबळांनी टीका केली, त्याच सोबत भुजबळांच्या घराणेशाहीवर देखील टीका केली. त्यामुळे आज अपेक्षेप्रमाणे भुजबळांनी टीका केली. मात्र ही टीका केली ती खासदार समीर भुजबळ यांनी.

राज ठाकरे यांना आज मिळणार उत्तर?

Last Updated: Monday, February 13, 2012, 18:41

नाशिकमध्ये कालच्या सभेत राज ठाकरेंनी भुजबळांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळं घायाळ भुजबळ आज नाशिकमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. या सभेत भुजबळ राज यांचा हिशोब चुकता करणार यात शंका नाही. त्यामुळं छगन भुजबळ काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

आदित्य ठाकरेंचा प्रचाराचा प्रवास 'जोरदार'

Last Updated: Monday, February 13, 2012, 14:45

महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे चांगलेच प्रचारसभेत गुंतलेले आहे. मुंबई, पुणे नंतर आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये प्रचार केला. आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष असल्याने तरूणांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी चांगलाच जोर लावला आहे.

जमिनी घेऊन 'नागडं' नाचायचं आहे का यांना? - राज

Last Updated: Monday, February 13, 2012, 11:23

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने नाशिकमध्ये सभा घेतली, आणि पालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकच एल्गार केला.