नाशिकमध्ये काका-पुतण्याचा रोड शो

Last Updated: Sunday, February 12, 2012, 19:10

नाशिक शहरात आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी रोड शोद्वारे प्रचार केला. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे बंद काचांमधून नाशिक रोड, जेल रोड, इंदिरानगर, सिडको परिसरात रोड शो केला. तर आदित्य ठाकरेंनी ओपन जीपमधून शहरात प्रचार केला.

नाशिक अपघातात तीन ठार

Last Updated: Saturday, February 11, 2012, 17:42

साईदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भक्तांवर आज काळाचा घाला झाला. मनमाड-नगर राज्यमहामार्गावर येवलाजवळ आज शनिवारी पहाटे मालट्रक आणि इंडिका कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने इंडिका मालट्रकवर धडकली. मृतांमध्ये उच्च न्यायालयातील वकीलाचा समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या रॅलीवर दगडफेक

Last Updated: Saturday, February 11, 2012, 16:40

नाशिकमधल्या सातपूर परीसरातील शिवाजीनगर भागात राष्ट्रवादीच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.

'नात्यागोत्या'तली निवडणूक !

Last Updated: Saturday, February 11, 2012, 11:41

आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच ठिकाणी आणि सर्वच पक्षांनी नात्यागोत्यांना तिकीटं दिली आहेत. नाशिकची निवडणूकही याला अपवाद नाही. नाशिक मनपाचं महापौर पद भूषवलेल्यांचे अनेक नातेवाईक सध्या निवडणुकीत आपलं नशीब अजमावत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांची बदली

Last Updated: Saturday, February 11, 2012, 11:04

ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिक महापालिका आयुक्त बी.डी.सानप यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी पी.वेलरासू यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

पवारांना कोंबडी, तंगड्यांशिवाय काही दिसत नाही - उद्धव

Last Updated: Saturday, February 11, 2012, 11:56

शरद पवारांना आजकाल कोंबडी आणि तंगड्यांशिवाय काही दिसत नाही असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला. सोनेरी कोंबडी कलानगरच्या खुराड्यातून बाहेर काढा याला प्रत्युत्तर देताना उद्धव यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला.

पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Last Updated: Friday, February 10, 2012, 18:18

नाशिकमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एका रिक्षावाल्यानं ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी रिक्षावाल्याला अटक करण्यात आलीय.

राज यांच्या 'रोड शो'ला शिवसैनिकांचा 'राडा'

Last Updated: Thursday, February 9, 2012, 22:29

नाशिकमध्ये मनसे उमेदवाराच्या रोड शो दरम्यान शिवसैनिक समोर आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी निघालेला रोड शो मेनरोड मार्गे गाडगेमहाराज पुतळ्याजवळ आला असताना हा प्रकार घडला.

राज ठाकरेंचा नाशिकमध्ये 'रोड शो'

Last Updated: Thursday, February 9, 2012, 16:26

पुण्यापाठोपाठ राज ठाकरेंचा आज नाशिकमध्ये रोड शो होतोय. नाशिकमध्ये १२२ जागांवर या पक्षाचे उमेदवार आहेत. चांडक सर्कलपासून या रोड शोला सुरुवात झाली आहे. दोन सत्रांमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.

देवळाली कॅम्पमध्ये मतदान केंद्रास आक्षेप

Last Updated: Thursday, February 9, 2012, 14:22

नाशिकचं हे देवळाली लष्करी प्रशिक्षणार्थी केंद्रात काही प्रशिक्षण घेणारे तर काही सैनिक राहतात. याच ठिकाणी प्रभाग क्रमांक ५४चं मतदान केंद्र उभारलं जात आहे. त्यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत.