मी ९ फेब्रुवारीला बोलणार - राज ठाकरे

Last Updated: Sunday, February 2, 2014, 20:56

नवी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोललेत. यापुढी तुम्ही टोल भरायचा नाही. जर कोणी मागितला तर त्याल तुडवा, असा नारा दिला. राज यांचा आदेश मिळताच राज्यात टोलफोडचा भडका उडाला. त्यानंतर या आंदोलनावरून राज यांच्यावर चोहोकडून टीकेचा मारा झाला. राज आज एका जाहीर कार्यक्रमात आले खरे; मात्र, त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. मी जे काही बोलणार आहे ते ९ तारखेला बोलेन, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे ते काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.

पवारांनी मुंडेंना पराभवाची आठवण करून दिली

पवारांनी मुंडेंना पराभवाची आठवण करून दिली

Last Updated: Sunday, February 2, 2014, 16:02

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना पराभवाची आठवण करून दिली आहे. शरद पवार यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांनी टीका केली होती, या टीकेला हे चोख उत्तर असल्याचं सांगण्यात येतंय.

`ऊस कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलंय`

`ऊस कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलंय`

Last Updated: Sunday, February 2, 2014, 16:17

देशातील सध्याचं वातावरण हे द्वेशाचं आहे. मुंबईत कापड गिरण्याबंद पाडल्या, त्याप्रमाणे राज्यात ऊसाचे कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलं आहे, असं शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

उदयनराजे भोसलेंबाबत शरद पवार म्हणालेत, `तवा`च रिकामा!

उदयनराजे भोसलेंबाबत शरद पवार म्हणालेत, `तवा`च रिकामा!

Last Updated: Saturday, February 1, 2014, 21:03

सातारा लोकसभा मतदार संघात भाकरी फिरवणार काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी विचारला, त्यावेळी साता-यात तवाच रिकामा आहे, असं उत्तर पवारांनी दिलंय. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर मोदी भेटीवर गोपीनाथ मुंडेना जोरदार टोला लगावला.

राज ठाकरेंचा शिवसेनेला `दे धक्का`, माजी जिल्हाप्रमुख मनसेत

Last Updated: Saturday, February 1, 2014, 19:33

पश्चिम महाष्ट्रातील काही शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील आणि खानापूर तालुका प्रमुख संजय विभूते यांनी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थित मनसे प्रवेश केला. यावेळी माजी आमदार परशराम उपरकर उपस्थित होते.

राज ठाकरे नाराज, कोणाची काढली खरडपट्टी

Last Updated: Saturday, February 1, 2014, 18:14

आपल्या बैठकीतल्या चर्चा बाहेर जातातच कशा असा सवाल विचारत राज ठाकरे यांनी मनसेच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. पुण्यात सुरु असलेल्या या बैठकीत दुस-या दिवशी कसं काम करावं याचं त्यांनी मार्गदर्शन केलं. मात्र शुक्रवारच्या बैठकीत पदाधिका-यांना ठाकरी भाषेत झापणा-या राज यांनी आज काहीसा मवाळ भाषेत सल्ला दिला.

`कामं करा!, नाहीतर दुसरी टीम तयार` - राज ठाकरे

`कामं करा!, नाहीतर दुसरी टीम तयार` - राज ठाकरे

Last Updated: Friday, January 31, 2014, 16:09

राज ठाकरे यांनी नाशिक आणि मुंबईच्या मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर, आज पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनाही सल्ला वजा इशारा दिला आहे.

महायुतीच्या नेत्यांचं सरकारवर आसूड

महायुतीच्या नेत्यांचं सरकारवर आसूड

Last Updated: Thursday, January 30, 2014, 22:24

महायुतीच्या इचलकरंजीत झालेल्या पहिल्या महासभेत सर्व नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. टोल, वीज, सहकारातला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा आदी मुद्यांवरून सरकारवर शेतकऱ्यांचा आसूड ओढला. मात्र सर्वांचा टीकेचा रोख होता तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर.

सांगलीवाडीतला टोल रद्द... महाराष्ट्राचं काय?

Last Updated: Thursday, January 30, 2014, 08:39

सांगलीतल्या सांगलीवाडीतील टोल रद्द करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोल रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

राज ठाकरेंवर चिथावणीखोर वक्तव्याचा गुन्हा दाखल

राज ठाकरेंवर चिथावणीखोर वक्तव्याचा गुन्हा दाखल

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 21:33

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील राजगड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.