Last Updated: Wednesday, February 12, 2014, 16:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकाही राजकीय पक्षांचे भान सुटत चालले आहे... निवडणुका जवळ आल्यामुळं जनतेच्या प्रश्नांची जाणिव झाली असावी असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना मारला आहे...
काही पक्ष लोकप्रियतेसाठी राजकारण करतात त्यामुळे जनतेची दिशाभूल होते असही अजित पवारांनी म्हटलयं. शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे पण आंदोलन करतांना कोणालाही त्रास होणार नाही हे बघितले पाहिजे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलयं...
छोटी-मोठी आंदोलन होत असतात – संजय राऊतछोटी-मोठी आंदोलनं होतं असतात असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्याचप्रमाणे मुंबईकर अशा आंदोलनात सहभागी होणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकारचा स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम – जावडेकरराज ठाकरे यांच्या आंदोलनाची शिवसेना आणि भाजपने खिल्ली उडवलीय. राज ठाकरे यांचं आंदोलन म्हणजे महाराष्ट्र सरकारचा स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम असल्याची टीका भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 12, 2014, 16:22