सचिनची ५०-५० एक्झिट
भारतीय क्रिकेट टीमचा कोहिनूर हिरा असणारा सचिन तेंडुलकर याने अखेर वन-डेतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रीडाविश्वात एकच हल्लकल्लोळ माजला. ज्याने क्रिकेटमधील यशाचे शिखर पादाक्रांत केले असा विश्वविक्रमी खेळाडू सचिन तेंडुलकर याची वन-डेतील निवृत्ती साऱ्यांनाच चुटपूट लावून गेली.
सचिन हा खेळाडू फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता तर संपूर्ण जगभर त्याच्या खेळाचा दबदबा होता. आणि त्यामुळेच सचिनच्या वन-डेतील निवृत्तीचे वृत्त जगभरातील बड्या वृत्तपत्रांनी मुख्य बातमी म्हणून प्रसिद्ध केली. या वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर ठळक मथळा देऊन या बातमीला प्रसिद्धी दिली.
द गार्डियन
भारताचा क्रिकेटर सचिन तेंडुलकर आतंरराष्ट्रीय क्रिकेट वन-डेमधून पायउतार झाला आहे.
सचिन तेंडुलकरने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आणि आपल्या टीमला २०१५च्या वर्ल्डकपसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत, तसेच त्यासाठी जोरदार तयारी करण्यासही सांगितले आहे.
बीबीसी
रेकॉर्ड ब्रेकिंग इंडियाचा धडकेबाज बॅट्समन सचिन तेंडुलकर हा वन-डे क्रिकेटमधून निवृत्त झालेला आहे. वयाच्या ३९व्या वर्षी सचिनने वनडेतून निवृत्त झाला आहे. त्याने म्हटलं आहे की, माझं स्वप्न पूर्ण झालं आहे, वर्ल्डकप विजेता टीमचा मी हिस्सा होतो. आणि तेच माझं स्वप्न होतं.
लिटील मास्टरने १९८९ मध्ये आपल्या करिअरला सुरवात केली होती. आणि त्याने ४६३ सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे. वन-डेमध्ये जगातील सर्वाधिक रन करणार सचिन एकमेव बॅट्समन आहे. ४४.८३ च्या सरासरीने १८,४२६ रन आमि ४९ शतके या प्रदिर्घ कारकिर्दीत समाविष्ट होती.
डॉन (पाकिस्तानी वृत्तपत्र)
भारताचा महान बॅट्समन सचिन तेंडुलकरने रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग ४९ शतकं करणारा तो वन-डेतील एकमेव खेळाडू आहे.
‘लिटील मास्टर’ अशी ओळख मिळवूनच सचिनने १९८९ मध्ये आपल्या करिअरला सुरवात केली. वयाच्या १६व्या वर्षी पाकिस्तानमध्ये त्यांनी प्रथम आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळाली. वकार युनिसने सचिनला वन-डेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भोपळाही फोडू दिला नव्हता.
फ्रान्स 24.com
२ एप्रिल २०११ मध्ये वन-डे वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेला हरवून भारतीय बॅट्समन सचिन तेंडुलकर आणि त्याच्या टीम सहकाऱ्यांनी इतिहास रचला होता. त्याच महान बॅट्समनने रविवारी आपल्या वन-डेतील निवृत्तीची घोषणा केली. वन-डे मध्ये ४९ शतकं करणारा तो एकमेव बॅट्समन आहे.
कसोटीतील ही महान असा बॅट्समन असणाऱ्या सचिनने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या २०१५ च्या वर्ल्डकपसाठी भारतीय निवड समितीने एक चांगला संघ निवडवा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
बँकॉक पोस्ट
मी ठरवलं आहे की, मी वन-डे सामन्यातून निवृत्ती घेत आहे. असं म्हणत त्याने आपला निर्णय भारतीय निवड समितीला कळविला.
मुंबईचा बॅट्समन जो जगातील वन-डेमध्ये सर्वाधिक रन करणारा एकमेव खेळाडू आहे. ज्याने १८४२६, रन केले. तब्बल ४६३ मॅचमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले, ४४.८३ इतकी त्याची सरासरी होती. तर त्याने तब्बल ४९ शतके ठोकली होती.
/marathi/slideshow/सचिन-वन-डेतून-निवृत्त-जगाने-घेतली-दखल_179.html/9