पकाऊ सिनेमे
बॉलिवूडमध्ये यंदा अनेक नवीन सिनेमे आले. यातील बऱ्याच सिनेमांनी १०० कोटी रुपयांचा व्यवसाय करत बॉलिवूडला सोनेरी दिवस दाखवले. मात्र याचबरोबर काही असेही सिनेमे आले, ज्यांच्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. हे सिनेमे वाजत गाजत आले, पण बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. मात्र २०१२ मधील या पकाऊ सिनेमांची यादी पाहून तुम्हाला नैराश्य आल्यास आमची जबाबदारी नाही, याची नोंद घ्यावी.
जोकर
या वर्षीच्या पकाऊ सिनेमांच्या यादीत वरचा नंबर लागलाय ते ‘जोकर’चा. फराह खानचा नवरा अशी ओळख असणाऱ्या शिरीष कुंदरचा हा महत्वाकांक्षी सिनेमा होता. यावरून त्याच्या महत्वाकांक्षा काय असतील, याची आपल्याला कल्पना आलीच असेल. अत्यंत टुकार विनोद, आचरटपणा यांच्या जीवावर या सिनेमाची कथा रचली गेली. पगलापूर नावाच्या एका गावामधअये नासामधील एक शास्त्रज्ञ येतो. गावाचं नाव प्रसिद्धीस यावं म्हणून गावकऱ्यांच्याच साथीने काही खल्पना लढवतो. अशी या सिनेमाची कथा. अक्षय कुमार, श्रेयस तळपदे आणि सोनाक्षी सिन्हा असूनही आणि चित्रांगदा सिंगचं हॉट आयदम साँग असूनही हा सिनेमा सपशेल आपटला.
अय्या
अत्यंत लाऊड! हा सिनेमा पाहून प्रेक्षकांनी हीच प्रतिक्रिया दिली. राणी मुखर्जीची सद्दी संपली असली, तरी पुन्हा ती झोकात आगमन करत आहे, असं प्रोमोजवरून वाटत होतं. मराठमोळ्या सचिन कुंडलकरचा हा बॉलिवूडमधला पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न होता. मराठमोळ्या देशपांडे कुटुंबावर काढलेल्या सिनेमामध्ये बरेच मराठी कलाकार होते. पण हा सिनेमा पाहून लोकांनी सिनेमागृहांतून पळ काढला. हा सिनेमा फ्लॉप झाला.
क्या सुपरकूल है हम
क्या कूल है हम या ७ वर्षांपूर्वी आलेल्या सिनेमाचा सिक्वल म्णून क्या सुपरकूल है हम हा सेक्स कॉमेडी सिनेमा यंदा आला. तुषार कपूर आणि रितेश देशमुख हे विनोदवीर असूनही सिनेमाला ते तारू शककले नाही. कुठलीही कथाच नसलेल्या या सिनेमात फॉरवर्डेड एसएमएस एखत्र करून लिहीलेल्या डायलॉग्जवर प्रेक्षक हसलेच नाहीत. त्यामुळे हा सिनेमाही पडला.
रश
पत्रकारितेवर आधारीत सिनेमात जर इमरान हाश्मी आणि नेहा धुपिया या ग्लॅमरस जोडीला घेऊन टिपिकल देमारपट काढला, तर काय होईल? तेच ‘रश’ सिनेमाच्या बाबतीत झालं. बातमीदारी आणि गुन्हेगारी यासारख्या महत्वाच्या विषयावर सिनेमा बनवताना कुठलाही अभ्यास न करता केवळ इंग्रजी सिनेमांवरून उचललेल्या सीन्सचा भडीमार केल्यावर प्रेक्षकांनी थिएटरमधून पोबारा केला आणि सिनेमा ‘फ्लॉप’ झाला.
भूत रिटर्न्स
या भयपटाला प्रेक्षक एवढे घाबरले, की ते सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गेलेच नाहीत. राम गोपाल वर्माचा उर्मिला मातोंडकरसोबत केलेला भूत हा सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतला होता. मात्र इतक्या वर्षांनी भूत रिटर्न्स आल्यावर प्रेक्षकांनी त्याची धकलच घेतली नाही. या सिनेमातून मनिषा कोइरालाने पुनरागमन केलं खरं, पण प्रेक्षकांनी मात्र सिनेमाकडे पाठच फिरवली.
हिरोइन
मधुर भांडारकरचा महत्वाकांक्षी सिनेमा हिरोइन हा प्रचंड पब्लिसिटी करत, वाजत गाजत आणला खरा.. पण करीनाचा उत्कृष्ट अभिनय असूनही सिनेमा फ्लॉपच झाला. आपल्याच फॅशन या सिनेमाचीच कथा पुन्हा पाहातोय की काय असं हा सिनेमा पाहाताना लोकांना वाटलं. नेहमीच्या पद्धतीने सेलिब्रिटींच्या आयुष्याची काळी बाजू बघून लोकांना कंटाळा आला, आणि सिनेमा फ्लॉप झाला.
जिस्म-२
पॉर्न स्टार सनी लिओन या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये दाखल झाली. हा सिनेमा येण्यापूर्वी त्याची बरीच प्रसिद्धी केली गेली. हा सिनेमा अत्यंत बीभत्स असेल, असा विचार करत त्याविरुद्धही बऱ्याच जणांनी आवाज उठवला. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यावर एकूणच सगळा फज्जा झाला होता. सनी लिओन पडद्यावर नेत्रसुख देत असली, तरीही या सिनेमात उत्सुकतेने पाहावं असं काहीच नसल्याचं म्हणत आंबटशौकीन प्रेक्षकांनीही डोळे बंद केले. सनी लिओनचं सौंदर्य पाहाण्यासारखं असलं, तरी अभिनयाशी तिचा काहीच संबंधच नसल्याचं सिनेमातून जाणवलं. आणि सिनेमा सुपरफ्लॉप झाला.
डिपार्टमेंट
राम गोपाल वर्माला अजून जुना सूर सापडला नसल्याचा हा आणखी एक पुरावा. डिपार्टमेंट या सिनेमात अमिताभ बच्चनसारखा महानायक असूनही हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला, हे कुणालाच कळलं नाही. ज्यांनी सिनेमा पाहीला, त्यांनी आयुष्यात कधी रामूचे सिनेमे पाहाणार नाही, अशी शपथ घेत थिएटरमधून काढता पाय घेतला. नतालिया कौरचं मादक आयटम साँगही फारसं लोकप्रिय झालं नाही आणि सिनेमा फ्लॉप झाला.
एजंट विनोद
या सिनेमाचं नाव एजंट विनोदऐवजी ट्रॅव्हल एजंट विनोद ठेवावं, असं अखेर प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहून सुचवलं. या सिनेमात नुसतंच या देशातून त्या देशामध्ये धावपळ पाहायला मिळत होती. देशी जेम्स बाँड सैफ अली खान नक्की या सिनेमात काय करत होता हे लोकांना समजलंच नाही. त्यामुळे वैतागून लोक थिएटरमधून पळून गेले.
अजब गजब लव्ह
जॅकी भगनानी अभिनित हा सिनेमा दक्षिणेतील सुपरहिट सिनेमाचा रिमेक होता. ‘धूम’ आणि ‘धूम २’ सारखे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या संजय गढवीने दिग्दरशित करूनही हा सिनेमा कुणालाही पाहावासा वाटला नाही. फालतू या सिनेमामुळे जरा यशाची चव चाखायला मिळते न मिळते तोच जॅकी भगनानीच्या खाती आणखी एक फ्लॉप जमा झाला.
कमाल धमाल मालामाल
`मालामाल वीकली` या सुपरहिट सिनेमाचा सिक्वल घेऊन प्रियदर्शनने `कमाल धमाल मालामाल` हा सिनेमा आणला. मात्र या सिनेमात काहीच धमाल नसल्याचं लक्षात आल्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमा पाहिलाच नाही आणि हा सिनेमा काहीच कमाल करू शकला नाही. श्रेयस तळपदे आणि नाना पाटेकर यांच्यासारखे दोन तगडे मराठी अभिनेते असूनही हा सिनेमा निकालात लागला.
/marathi/slideshow/२०१२मधील-पकाऊ-सिनेमे_173.html/9