वादग्रस्त सिनेमे
२०१२ साली बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे रिलीज झाले. या वर्षी हिंदी सिनेमा अधिक बोल्ड झाल्याचं दिसून आलं. याशिवाय काही सिनेमांचे विषय, त्यातील प्रसंग वादग्रस्त ठरले. तर काही सिनेमांच्या प्रदर्शनावरून वादंग माजला. असे काही वादग्रस्त चित्रपट
हेट स्टोरी
हेट स्टोरी या सिनेमातील अर्धनग्न पोस्टर आणि हिरोइन पाउली दान हिचे बोल्ड सीन्स यामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. मात्र त्यामुळेच या सिनेमाला प्रसिद्धी मिळून हा सिनेमा हिट ठरला.
जिस्म-२
जिस्म-२ हा सिनेमा जिस्म या सिनेमाचा पुढील भाग असल्याचं सांगण्यात आलं होतं. मुळातच भट्ट कंपनीचा सिनेमा म्हणजे बोल्ड असणारच. मात्र यात पॉर्न स्टार सनी लिओनला लाँच करत पूजा भट्ट हिने कहरच केला. या सिनेमाच्या जाहिरातींवरही सेंसॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा सिनेमा या वर्षीचा प्रचंड वादग्रस्त सिनेमा ठरला.
जब तक है जान
जब तक है जान हा सिनेमा वादग्रस्त ठरला, तो त्या सिनेमाने सगळी थिएटर्स काबिज केल्यामुळे. या सिनेमाने सर्व थिएटर्समध्ये आपलाच सिनेमा रिलीज करायचा ठरवल्यामुळे त्यासोबत प्रदर्शित होणाऱ्या सन ऑफ सरदार सिनेमाला थिएटर्स मिळण्यास अडचणी आल्या. याबद्दल सन ऑफ सरदारचा निर्माता अजय देवगण याने यशराज फिल्म्सवर खटलाही भरला होता.
सन ऑफ सरदार
‘सन ऑफ सरदार’ या सिनेमामुळे अजय देवगणविरोधात शीख समुदायाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या सिनेमात शिखांचा अपमान झाल्याचं शिख समुदायाचं म्हणणं होतं.
शांघाय
शांघाय सिनेमातील भारत माता की.. या गाण्यावरून वाद ओढावला होता. भगत सिंग सेना या संघटनेने सिनेमा प्रदर्शित करण्यास विरोध केला होता.
हिरोइन
हिरोइन सिनेमाच्या पोस्टरपासूनच वाद सुरू झाला होता. तसंच या सिनेमातील समलिंगी संबंधांवर आधारित सीन्स आणि दुबईशी संबंधित आक्षेपार्ह डायलॉग्जमुळे हा सिनेमा वादग्रस्त ठरला
विकी डोनर
विकी डोनर सिनेमाचा विषयच वादग्रस्त होता. वीर्यदान या विषयावर प्रथमच भारतीय सिनेमा निर्माण केला गेला. मात्र हा सिनेमा अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला गेल्यामुळे या सिनेमावरील वाद संपुष्टात येऊन हा सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतला.
बर्फी
बर्फी सिनेमा सुपरहिट तर ठरला. मात्र, वाद उफाळून आला तो बर्फीला ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा. या सिनेमातील अनेक प्रसंग हे हॉलिवूड आणि इतर आंतरराष्ट्रीय सिनेमांवरून उचलल्याचं लक्षात आलं. त्यामुळे हा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पाठवणं चूक असल्याचं बऱ्याच जाणकारांचं म्हणणं होतं. त्यामुळे हा सिनेमा वादात अडकला होता.
जोकर
जोकर हा सिनेमा वादग्रस्त ठरला कारण भारतीय या मराठी सिनेमाच्या कथेशी असलेलं जोकरचं साधर्म्य. हा सिनेमा भारतीय याच सिनेमासोबत आल्यामुळे मूळ कथा कुणाची, यावर वाद निर्माण झाला होता. अक्षय कुमारही आपल्या सिनेमावर खुष नसल्याने त्याने प्रमोशन करण्यास नकार दिला. त्यामुळे हा सिनेमा खूप चर्चेत राहिला.
एक था टायगर
एक था टायगर या सिनेमाची रिलीज डेट १५ ऑगस्ट ठेवल्यामुळे आधीच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला `भारतीय` ह मराठी सिनेमाला थिएटर मालकांनी आपल्या सिनेमागृहांमधून काढून टाकला. यामुळे मराठी निर्मात्यांनी आवाज उवला. पण, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यामुळे हा सिनेमा वादग्रस्त ठरला होता.
/marathi/slideshow/२०१२मधील-वादग्रस्त-सिनेमे_174.html/9