पोलिसांची मोगलाई : चार पोलीस निलंबित

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 20:53

उस्मानाबादमधील कनगरा गावात दारूबंदीची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना झालेल्या मारहाण प्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.

रोहन गुच्छेत हत्याप्रकरण, दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

Last Updated: Sunday, May 4, 2014, 16:39

कल्याणच्या रोहन गुच्छेत अपहरण आणि हत्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना निलंबित करण्यात आलंय. तायडेंसह आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय.

शीतल म्हात्रे प्रकरणी पालिकेत हंगामा, पाच नगरसेवक निलंबित

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 07:48

शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी विरोधकांनी केली. विरोधकांच्या गोंधळात सभागृह तिसर्‍यांदा गुंडाळले गेले. यावेळी विरोधकांनी गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला. गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या पाच सदस्यांवर निलंबनाची कारवाई करीत महापौर सुनील प्रभू यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला. तसा आरोप विरोधकांनी केलाय.

कहर... दुर्घटनेतील जखमींकडे डॉक्टरांनी मागितले पैसे!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 12:11

माझगाव डॉकयार्डमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेकडून रक्त तपासण्यासाठी इथल्या डॉक्टरांनी निर्लज्जपणे पैसे मागितले. त्यामुळे नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली.

मनसेचे दरेकर निलंबित, CM ला शिवीगाळ!

Last Updated: Friday, July 26, 2013, 17:18

मनसे आमदार प्रविण दरेकर यांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. विधानसभेत मुख्यमंत्र्यांना शिविगाळ केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीये.

राम कदम यांना अटक

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 14:00

मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांना पोलिसांनी अटक केलीय. रेशनिंग ऑफिसर महेश पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलीय.

राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू निलंबित

Last Updated: Thursday, May 16, 2013, 13:21

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अटक करण्यात आलीये. या खेळाडूंना निलंबित कऱण्यात आले आहे.

राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढले

Last Updated: Sunday, March 31, 2013, 08:53

निलंबित आमदार राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना देण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस दलाने घेतला.

निलंबित आमदार क्षितीज ठाकूर राज ठाकरेंच्या भेटीला

Last Updated: Thursday, March 28, 2013, 15:10

निलंबित आमदार क्षितीज ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

`किंगफिशर`चं उड्डाण लायसन्स निलंबित

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 10:54

आर्थिक संकटात सापडलेल्या खाजगी विमान कंपनी ‘किंगफिशर एअरलाइन्स’चं उड्डाण लायसन्स निलंबित करण्यात आलंय.

फेसबुक पोस्टच्या वादात मुख्यमंत्र्यांचीही उडी...

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 15:57

पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

`कसाब प्रकरणात कमावलय ते फेसबुकमध्ये घालवलं`

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:26

महाराष्ट्रातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. फेसबुक पोस्टनंतर पोलिसांवर कारवाईसाठी केंद्रातून राज्यावर दबाव आहे. या राजकारणामुळे दबावापोटी पोलिसांचे खच्चीकरण केले जात आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली. ते पुढे म्हणतात, `आबांनी, कसाब प्रकरणात कमावलय ते फेसबुकमध्ये घालवलं`

पालघर फेसबुक प्रकरण : कारवाई चुकीची, पोलीस निलंबित

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:23

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर वादग्रस्त विधान करणाऱ्या दोन मुलींना अटक केल्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच एका न्यायाधिशाची बदली करण्यात आलीय.

गुंडाला पाठीशी घालणारे पोलीस निलंबित

Last Updated: Thursday, October 11, 2012, 12:11

नागपुरातील गुंड इक्बाल शेख हत्याप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवून पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.

तुरुंग महानिरीक्षक पवार निलंबित

Last Updated: Monday, June 18, 2012, 11:51

येरवडा जेलमध्ये कातिल सिद्दीकी या संशयित अतिरेक्याच्या हत्याप्रकरणी तुरुंग महानिरीक्षक प्रकाश पवार यांच्यासह चारजण निलंबित करण्यात आलेत. निलंबित इतर कर्मचा-यांमध्ये तुरुंग अधिकारी चंद्रकिरण तायडे आणि एस. जाधव आणि आर. अवघडे यांचा समावेश आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ५ खेळाडू निलंबित

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 18:37

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ५ क्रिकेटपटुंना निलंबित करण्यात आलंय. बीसीसीआयनं ही कारवाई केलीय.

बलात्कारी ACP महाबोले निलंबित

Last Updated: Thursday, April 19, 2012, 06:47

एका महिलेवर सतत सात महिने बलात्कार करण्याचा आरोप असलेला सहायक पोलीस आयुक्त अनिल महाबोले याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज, बुधवारी ही माहिती दिली.

'झी २४ तास'चा दणका, पोलीस निलंबित

Last Updated: Sunday, April 15, 2012, 15:10

उस्मानाबादच्या बलात्कारीत कुमारी मातेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अझीझ अनदूरकर यांना निलंबित करण्यात आलं आहे.

सेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे

Last Updated: Friday, March 30, 2012, 20:37

शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.

युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

Last Updated: Friday, March 30, 2012, 14:32

रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

आदर्श घोटाळा : फाटक, प्रदीप व्यास निलंबित

Last Updated: Thursday, March 22, 2012, 13:47

आदर्श घोटाळ्यातले आरोपी असलेले मुंबईचे तत्कालिन आयुक्त जयराज फाटक आणि काल सीबीआयनं अटक केलेले वित्त विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांना निलंबित केल्याची माहिती राज्य सरकारनं न्यायालयात दिली.

काँग्रेसमधून कन्नैयालाल गिडवाणी निलंबित

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 22:47

कन्नैयालाल गिडवाणी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. कालच त्यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज केली.