टोलचा फटका एसटी महामंडळाला

Last Updated: Saturday, May 3, 2014, 08:41

टोलनाक्यांमुळे राज्यभरात डोकेदुखी वाढली असताना आता, टोलचा फटका एसटी महामंडळाच्या नागपूर विभागालाही बसलाय. गेल्या तीन वर्षांपासून नागपूर विभाग तोट्यात आहे. तोट्याच्या रकमेपैकी जवळपास एक तृतीयांश रक्कम निव्वळ टोलसाठी खर्च होत असल्यानं एसटीचं चाक आणखी गाळात रूततंय.

मुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस

Last Updated: Tuesday, April 1, 2014, 12:17

आज मुंबई शहर आणि परिसरात बेस्टची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीनं ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केलीय. मुंबई शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ६० जादा बसेस सोडल्या आहेत.

एसटीच्या टोल रद्दला जयंत पाटलांचा विरोध

Last Updated: Thursday, February 13, 2014, 21:59

एकीकडे एसटीला टोल पूर्णपणे माफ करावा अशी मागणी केली जात असतांना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील ह्यांनी मात्र एसटीनेही टोल भरावा असा आग्रह धरला आहे.

कडेवर मुल घेऊन तिचा लढा सुरू

Last Updated: Thursday, February 6, 2014, 15:38

स्त्रियांच्या आयुष्यात संघर्ष असतोच... मग ती एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीची सीईओ असो की गृहिणी... ही आहे एक कहाणी अशाच एका संघर्षाची.. एसटीची एक महिला कंडक्टर रोजच्या जगण्याची लढाई लढतेय... तिच्या लढयाला अद्याप यश आलेलं नाही... पण रोज धावणाऱ्या एसटीच्या चाकांवरचा तिचा लढा सुरुच आहे.

चला नोकरीची संधी: एसटीची भरती प्रक्रिया सुरू

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:59

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विविध प्रवर्गात उमेदवारांची भरती प्रक्रिया हाती घेतलीय. त्या अनुषंगानं एसटीतर्फे जाहिरात आणि सूचना प्रसिद्ध करण्यात आलीय. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचे असून अर्जाची नोंदणी करण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी २०१४ ही आहे.

खुशखबरः रातराणीचे भाडे १५ टक्क्यांनी कमी

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 15:37

आज मध्यरात्रीपासून रातराणीच्या भाड्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

नोकरीची संधी:कोकण विभाग एसटी, ९०० चालक पदं रिक्त

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 13:39

एसटीच्या चालक पदासाठी आठवी पासवरून दहावी पासची अट लागू केल्यानं एक वर्ष उलटलं तरी चालकांची संपूर्ण भरती होऊ शकली नाही. एसटीला कोकण विभागाचं सर्वाधिक टेन्शन असून, इथं चालक म्हणून कोणी पुढं येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळं खास कोकण विभागासाठी चालक पदाची पुन्हा जाहिरात काढण्यात येणार असल्याचं एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

पुण्यातील स.प. महाविद्यालयाला दणका, मान्यताच रद्द

Last Updated: Thursday, November 28, 2013, 09:27

पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या महाविद्यालयाने बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज न स्विकारल्याने राज्याच्या उच्च माध्यमिक महामंडळाने नियमाला फाटा दिल्याच्या कारणाने जोदरार झटका दिलाय.

एसटीचा प्रवास महागला, ९ नोव्हेंबरपासून भाडेवाढ

Last Updated: Thursday, November 7, 2013, 20:06

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. पहिल्या १२ किमीपर्यंत ही भाडेवाढ नाही. ही भाडेवाढ १ आणि २ रूपये टप्प्यानुसार असणार आहे.

विजय कोंडकेंचा यूटर्न, चित्रपट महामंडळाचे सात लाख कोण देणार?

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 15:03

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या प्रकरणी विद्यमान अध्यक्ष विजय कोंडके यांनी यूटर्न घेतल्याने त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवल्यानंतर चौकशी हवेत विरली आहे. त्यामुळे वादग्रस्त ठरलेली सात लाखांची रक्कम कोण देणार हा प्रश्न कायम आहे.

एसटीत भरणार २००० चालकांची पदे

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 09:36

बेरोजगार तरुणांना खूशखबर आहे. एस.टी.त चालकांची तब्बल दोन हजार पदे भरण्यात येणार असून याबाबतची जाहिरात महिनाभरात निघणार आहे. ही भरती केवळ कोकणसाठी स्वतंत्र असणार आहे. याबाबचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.

कृष्णा खोरे चौकशी अहवाल ‘गायब’

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 12:17

कृष्णा खोरे विकास महामंडळातील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवालच गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलाय.

एनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल

Last Updated: Thursday, September 5, 2013, 17:14

मराठी चित्रपटाने आता यश मिळवत कोटीच्या घरात पदापर्ण केले आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम केला आहे. आणि आता राष्ट्रीय चित्रपट महामंडळ दरवर्षी २ मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

मराठी चित्रपट महामंडळाच्या सभेत गोंधळ

Last Updated: Saturday, August 3, 2013, 12:44

चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी अखेर राजीनामा दिलाय. कोल्हापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षीक सभेत प्रचंड गोंधळ झाला.

एसटी महामंडळाचा नवा `हिरकणी कक्ष`

Last Updated: Friday, May 10, 2013, 18:04

एसटी स्थानक अथवा बसमध्ये तान्हुल्याला दूध पाजायला मातांना खूप ओशाळल्यासारखे वाटते. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाने ‘हिरकणी कक्ष’ नावाचा उपाय शोधून काढला आहे.

कोकणचं आरक्षण फुल्ल... नो टेन्शन!

Last Updated: Thursday, April 11, 2013, 16:27

काही लहानग्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात तर काहींच्या होण्याच्या मार्गावर आहेत. साहजिकच सुट्ट्या लागल्यानंतर पहिला बेत तयार असतो तो गावच्या फेरफटक्याचा... गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभावानं आता एसटी यासाठी तयार झालीय.

`बोर्डाच्या परीक्षेसाठी खाजगी शाळांचे वर्ग मिळणार नाही`

Last Updated: Thursday, February 14, 2013, 08:49

आत्तापर्यंत पालक आणि मुलांना कोंडीत पकडणाऱ्या खाजगी शाळांनी आता तर चक्क राज्य सरकारलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याला `ब्रँड अँबेसिडर` मिळेना

Last Updated: Sunday, December 9, 2012, 19:47

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा ब्रँड अँम्बेसिडरचा शोध थांबल्यात जमा आहे. माधुरी दीक्षितच्या अटी, सचिन तेंडुलकरचा थंड प्रतिसाद आणि इतर सेलिब्रेटींच्या विविध कारणांमुळं पर्यटन स्थळ स्वतःच ब्रँड अम्बेसिडर असल्याचं म्हणायची वेळ पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आलीय....

गरिबांचा प्रवासही महागणार!

Last Updated: Friday, September 14, 2012, 09:44

केंद्र सरकारनं डिझेल दरात प्रति लिटर तब्बल पाच रूपयांची वाढ केल्यानं एसटीच्या इंधन खर्चात दररोज ६० लाख रूपयांची वाढ झालीय. त्यामुळे एसटीलाही लवकरच मोठी दरवाढ करावी लागणार आहे.

एसटी कर्मचारी संघटनेच्या संपाला मनसेचा विरोध

Last Updated: Thursday, September 13, 2012, 10:37

एसटी कर्मचा-यांनी येत्या १७तारखेला पुकारलेल्या संपाला मनसे परिवहन सेनेनं विरोध केलाय. एसटीमधल्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना कर्मचा-यांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोपही मनसे परिवहन संघटनेनं केलाय.

पीएमपीच्या बसेस आरटीओने केल्या जप्त

Last Updated: Friday, April 13, 2012, 17:29

पुण्यातल्या पीएमपीच्या तीन बसेस आरटीओनं जप्त केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून थकीत असलेला मोटार वाहन कर न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. दोन सरकारी संस्थांमधील अनोख्या कारभाराचा नमुना यानिमित्तानं पुढे आलाय.

विदर्भ सिंचन महामंडळात ३००० कोटींचा भ्रष्टाचार

Last Updated: Monday, April 2, 2012, 13:50

विदर्भ सिंचन विकास महामंडळात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानसभेत खडसेंनी हा गौप्यस्फोट केलाय

धुळे-जळगावातील शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाला विरोध

Last Updated: Sunday, March 11, 2012, 15:47

धुळे आणि जळगावात कच्च्या तेलाचे साठे आढळून आलेत. तेलाचे साठे काढण्यासाठी गावक-यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी विहीर खणण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरु केलेल्या जमिन अधिग्रहणाला गावक-यांनी विरोध केला आहे.