प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे निधन

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 18:12

प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

इंग्लंडचे माजी कॅप्टन टोनी ग्रेग यांचे निधन

Last Updated: Sunday, December 30, 2012, 09:52

इंग्लंडचे माजी कॅप्टन आणि प्रसिद्ध कॉमेन्टेटर टोनी ग्रेग यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी ह्रदयविकारच्या झटक्याने ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत निधन झालं.

बाभळगाव ते बाभळगाव,

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 22:21

महाराष्ट्राचा लाडका नेता असलेल्या विलासराव देशमुखांना आज तमाम देशवासियांनी अखेरचा निरोप दिला. ज्या बाभळगावातून त्यांची कारकिर्द सुरु झाली, त्याच बाभळगावात लाखोंच्या जनसमुदायानं साश्रू नयनांनी त्यांना अलविदा केला. विलासरावांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतला आहे, बाभळगाव ते बाभळगावमध्ये.

राष्ट्रपतींसह विलासरावांना सेलिब्रिटींची श्रद्धांजली

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 20:44

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंधप्रधान यांच्याहस देशातील नेते, सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, अभिनेता अक्षय कुमार यांने मुंबईला शांघाय करणाऱ्याला नेत्याला माझी श्रद्धांजली , असे ट्विट केले आहे.

विलासराव देशमुख यांचे निधन

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 15:39

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचे आज दुपारी १.२४ मिनिटांनी निधन झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना चेन्नईतील ग्लोबल रुणालयात दाखल करण्यात आले होते.

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन

Last Updated: Monday, July 23, 2012, 13:39

सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल (९७ ) यांचे कानपूरमध्ये ११.२० मिनिटाने निधन झाले. हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना गुरुवारी कानपूर मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा शव मेडिकल कॉलेजला दान करण्यात आला आहे.

राजेश खन्ना यांचे प्रमुख चित्रपट!

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 14:21

चेतन आनंद यांच्‍या ‘आखरी खत’ या चित्रपटापासून त्‍यांनी फिल्‍मी दुनियेत पाऊल ठेवले. त्‍यानंतर त्‍यांनी ‘आनंद’, आरधना, कटी पतंग, रोटी, अमरप्रेम, सफर, सच्‍चा झूठा यासारखे सुपरहिट चित्रपट दिले. ‘दो दिलो के खेल मे’ हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट त्‍यांचा अखेरचा ठरला.

बॉलिवुडचे 'काका' राजेश खन्नांची एक्झिट

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 15:21

बॉलिवूड सुपरस्‍टार राजेश खन्ना यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना आज पुन्हा रूग्णालयात प्राणज्योत माळवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी हिंदी चिपटसृष्टीत त्यांचा नावाचा दबदबा होता. पहिला सुपस्टारची एक्झीट झाली आहे. त्यांच्य निधनाने बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

समाज हितासाठी लढणारे 'मृणाल' वादळ

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 11:45

मृणालताईंचा स्वभाव, राजकीय सामाजिक कारकीर्द याविषयीच्या अनेक पैलूंना मान्यवरांनी उजाळा दिला. सामान्य माणसांच्या प्रश्नांची तड लावणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे आयुष्य झाले होते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या कार्याची माहिती असणारे आणि त्यांना जवळून पाहिलेल्यापैकी काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. त्यांच्यात शब्दात..

पाणीवाली बाई, लाटणेवाली बाई

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 11:23

ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी शेवटपर्यंत सामान्यांसाठी लढा दिला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी सामान्यांसाठी आपले आयुष्य वेचले. पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे 'पाणीवाली बाई' आणि महागाईच्या विरोधात केलेल्या प्रखर आंदोलनामुळे 'लाटणेवाली बाई' म्हणून त्या देशभरात प्रसिद्ध होत्या.

पाहा – 'रणरागिणी'

Last Updated: Sunday, July 22, 2012, 10:49

'रणरागिणी' मृणालताईंचा स्वभाव, राजकीय सामाजिक कारकीर्द याविषयीच्या अनेक पैलूंना मान्यवरांनी उजाळा दिला. सामान्य माणसांच्या प्रश्नांची तड लावणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे आयुष्य झाले होते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या कार्याची माहिती असणारे आणि त्यांना जवळून पाहिलेल्यापैकी काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. त्यांच्यात शब्दात..

भाजप नेते बाळ आपटे यांचे निधन

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 16:40

भारतीय जनता पक्षात महत्त्वाचे स्थान असणारे बळवंत ऊर्फ बाळ आपटे यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. आपटे यांचे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

प्राध्यापक राम बापट यांचे पुण्यात निधन

Last Updated: Monday, July 2, 2012, 17:19

ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक राम बापट यांचे पुण्यात आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. बापट हे राज्याशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक होते. त्यांनी पुणे विद्यापीठासह अनेक महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष ज्ञानदानाचे काम केले.

प्रीतमकुमार शेगावकर यांचे निधन

Last Updated: Thursday, June 21, 2012, 10:56

रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रीतमकुमार शेगावकर यांचे निधन झालं आहे. शेगावकरांचे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ह्यदयविकारानं निधन झाले.माजी राज्यमंत्री असलेले शेगावकर हे रामदास आठवले यांचे निकटवर्तीय होते.

स्वातंत्र्यसेनानी मोहाडीकर यांचे निधन

Last Updated: Saturday, May 19, 2012, 09:46

स्वातंत्र्यसेनानी प्रकाश मोहाडीकर यांचे आज शनिवारी दादर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.

अभिनेत्री अचला सचदेव यांचे निधन

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 09:07

बॉलिवूडमधील अभिनेत्री अचला सचदेव (९१) यांचे दीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांच्यावर आज मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे निधन

Last Updated: Friday, March 23, 2012, 11:54

महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या आमदार विमल मुंदडा ( ४९) यांचे गुरूवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. विमल मुंदडा या गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होत्या.

ज्येष्ठ रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे यांचं निधन

Last Updated: Sunday, December 25, 2011, 14:54

ज्येष्ठ रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे यांचं आज निधन झालं. त्यांचा मुंबईतल्या राहत्या घरी सत्यदेव दुबे याचं निधन झालं, १९३६ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी मराठी रंगभूमीसाठी भरीव कामगिरी केली होती.