Last Updated: Monday, June 2, 2014, 10:14
बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि तिचा नवरा संजय कपूर आता एकमेकांच्या सहमतीनं घटस्फोट घेणार आहे. दोन्ही मुलांच्या कस्टडीसाठी संजयनं केलेला अर्ज आता त्यानं वापस घेतलाय. दोघांनी मुंबईतल्या वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. कोर्टानं शनिवारी तब्बल 6 तास दोघांसोबत मीटिंग घेतल्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतला.